गोंदिया तालुक्यातील 90 तलाव लिलावातून मिळाले 5 लाखाचे महसूल

0
60

गोंदिया,दि.02ः- गेल्या दोन वर्षापासून कोरोनासंसर्गामुळे जिल्हा परिषदेच्या मालकीचे असलेल्या तलावांचे लिलाव न झाल्याने मत्स्यव्यवसायिकांना अडचणीचा सामना करावा लागला होता.मात्र आता कोरोना संसर्ग संपुष्ठात आल्याने यावर्षी गोंदिया पंचायत समिती कार्यालयातंर्गत येत असलेल्या तालुक्यातील 90 तलावांचे जाहिर लिलाव पंचायत समितीच्या सभागृहात नुकतेच करण्यात आले.या लिलावातून सुमार 5.50 लाखाचा महसुल जिल्हा परिषदेच्या शासकीय तिजोरीत गोळा झाला आहे.पंचायत समितीचे सभापती मुनेश रहागंडाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लिलावाला गटविकास अधिकारी राजकुमार पुराम,उपसभापती निरज उपवंशी,विस्तार अधिकारी संगिता अग्रवाल उपस्थित होते.

सन 2016 ते 2021 पर्यंत कालावधीतील तलावांचे मत्स्यसंस्थाना कोरोना प्रादुर्भावामुळे लिलाव करण्यात आलेले नव्हते.त्यातच काही नविन तलावांचा समावेश झालेला होता.त्यासोबत 2017 ते 22 हा कालावधी संपलेल्या जिल्हा परिषदेच्या तलावांचे लिलाव थांबलेले होते.त्या तलावांचे लिलाव पंचायत समितीच्या सभागृहात मत्स्य संस्थासोबत वाटाघाटीने व ठेका पद्धतीने करण्यात आले.सदर लिलावामुळे मत्स्य पालन सहकारी संस्थाना व्यवसायाकरीता प्रोत्साहन मिळाले आहे.