माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा उपक्रम
सडक अर्जुनी,दि.१९ः- माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ईंजी राजकुमार बडोले फांऊडेशनच्या वतीने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ १९ मे २०२४ ला दुपारी १२ वाजता जनसंपर्क कार्यालय सडक/अर्जुनी येथे आयोजीत करण्यात आला आहे.
अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रा अंतर्गत नवेगावबांध येथे नवोदय विद्यालय आहे.या विद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना नवोदय ची परिक्षा ज्या शाळेत शिकत असतात त्याच परिक्षा केंद्रावरून परिक्षा द्यावी लागते. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय नवेगावबांध येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला जातो.नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविण्या-या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आयोजित केला आहे. तेव्हा अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांनी व पालकांनी तसेच अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ईंजी राजकुमार बडोले फांऊडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.