नवीन शासकीय वसतीगृहाकरीता खाजगी इमारतीची आवश्यकता

0
15

गोंदिया,दि.३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्हयात गोंदिया सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व देवरी येथे १०० विद्यार्थ्यीनींची प्रवेशक्षमता असलेले मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह मंजूर करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्र सन २०१५-१६ या वर्षात ही वसतीगृहे चालू करण्याकरीता खाजगी भाड्याच्या इमारतीची आवश्यकता आहे. या इमारतीमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना निवासाकरीता पूरेशा प्रमाणात निवासी खोल्या, स्वंयपाकगृह, भोजनकक्ष, कोठीघर, वाचनालय, कार्यालयासाठी जागा, वसतीगृह अधीक्षकांच्या निवासस्थानाकरीता जागा या सर्व बांबीसाठी सोयीनेयुक्त आवश्यक जागा त्याचप्रमाणे शौचालय, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वापरण्याच्या पाण्याची व्यवस्था, विहीर/बोरींग पाण्याची विद्यूत मोटार, सर्व खोल्यांमध्ये विद्युत लाईट व पंखे, खेळण्यासाठी पटांगणे अशा सर्व सोयींनीयुक्त ८००० वर्गफुट बांधकाम असलेली सुस्थितीतील इमारत वसतीगृहाकरीता भाड्याने घ्यावयाची आहे. ज्यांच्याकडे २५ ते ३० खोल्या, १० शौचालये, १० स्नानगृहे असलेल्यांनी इमारत मालकीच्या हक्काबाबतचे प्रमाणपत्रे, नकाशा, करपावती, बांधकाम पुर्ण असल्याचा दाखला आरोग्याच्यादृष्टीने निवासास योग्य असल्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांचा दाखला इत्यादी कागदपत्रासह इमारतीच्या मालकाने आपले प्रस्ताव ८ फेब्रुवारीपर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे सादर करावा. प्राप्त प्रस्तावाची छाननी केल्यावर मोक्का तपासणी करुन प्रस्ताव मंजूरीकरीता समाज कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सादर करण्यात येईल. इमारतीचे सार्वजनिक बांधकाम ठरवून देईल त्यानूसार भाडे देण्यात येईल. असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.