बोटेझरी जंगलात पोलिस-नक्षल चकमक

0
9

गडचिरोली-कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या बोटेझरी जंगल परिसरात मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी या ठिकाणावरून एक बारा बोअर रायफल, आठ पिट्टू व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे. gadchiroli nxal
गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत येणाऱ्या बोटेझरी जंगल परिसरात पोलीस नक्षल  विरोधी अभियान राबवीत असताना नक्षल्यांसोबत पोलिसांची चकमक झाली. पोलिसांनी प्रत्युत्तर देताना नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर शोध मोहीम राबवून नक्षलि साहित्य जप्त केलं. तसेच या परिसरात नक्षल विरोधी अभियान तीव्र केले आहे.