वर्धिनीद्वारे शाश्वत विकासाची गोंदियाची वाटचाल प्रशंसनीय आहे- उषा मेंढे

0
7

गोंदिया,दि.३ : ग्रामीण भागामध्ये रोजगारासोबत महिलांना आर्थिक शिस्त, हिशोबात पारदर्शकता, आरोग्य, शिक्षण, उत्तरदायित्व आणि सामाजिक जबाबदारीचे भान देणारी वर्धिनी गोंदिया जिल्हयात शाश्वत विकासाची उभारणी करीत आहे. असे प्रतिपादन जि.प.च्या अध्यक्षा उषा मेंढे यांनी केले.
महिला सक्षमीकरण करणाऱ्या वर्धिनी स्नेहसंमेलनाचा समारोप कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृह येथे नुकताच(ता.३० जानेवारी ) पार पडला. यावेळी अध्यक्षपदावरुन त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीवास्तव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, अति. प्रकल्प अधिकारी प्रमोद घाटे, चंद्रपूर वर्धिनी चमुचे अमोल रोटीले व हिमाणी राजपूत उपस्थित होते.प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांनी केले. यावेळी सोनिया वाढई संगिता फुलबांधे मालता गावड, विणा वासनिक, कविता मेश्राम, देवांगणा भेंडारकर, रंजना शिवणकर, रागिनी रामटेके, अल्का मडावी आणि गणिता खोबा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.