सोनोली-भोम्बोडी गावाला अतिवृष्टीचा फटका;मदतीसाठी नावेने पोहचले जिप सदस्य किरण पारधी

0
43

तिरोडा : 10 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका सर्वसामान्य नगरिकांसह शेतकर्‍यांना बसला. यात कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रातील नदी-नाल्याकाठच्या गावांना तर पाण्याने वेढून टाकले होते. अंगणवाडी, शाळा, गावातील चौकांना तलावाचे स्वरूप आले होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. बाहेर पडावे तरी कसे? असा प्रश्न गावकर्‍यांना पडला होता. अशात जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी आपल्या सहकार्‍यांसह आपल्या क्षेत्रातील पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना त्यांना सोनोली गाव जलमय झाल्याची माहिती कळली. तसेच ते, सालेबरडीचे पोलीस पाटील श्यामलाल नागपूरे व काही सहकार्‍यांना सोबत घेवून नावेने सोनोली गावात मदतीसाठी पोहचले.

अतिवृष्टीचा फटका

दरम्यान त्यांना सोनोली गावाच्या जवळ असलेल्या नाल्याचे जलस्तर वाढून नाल्याजवळील शेतात असलेला गोठा पाण्यात पूर्णपणे बुडल्याचे कळले. त्या गोठ्यात 3 गरोदर म्हशी, 3 म्हशींचे बछडे, कोंबड्या, शेतीची अवजारे, खत व कीटकनाशके होते. पाण्यात बुडून सदर सर्व प्राण्याचा मृत्यू झाला. तसेच खत व कीटकनाशकांचे नुकसान झाले. पुनीत ठाकरे रा. सोनोली असे त्या नुकसानग्रस्त शेतकर्‍याचे नाव आहे.

जिल्हा परिषद सदस्य किरणकुमार पारधी यांनी या घटनेची माहिती तिरोड्याचे गट विकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेचे सीईओ, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांना मोबाइलद्वारे दिली. त्यावर गट विकास अधिकारी लिल्हारे यांनी तात्काळ सोनोली गाव गाठले व परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी बाधितांना काढण्यासाठी तेथे कोणतीच उपाययोजना नव्हती. दरम्यान जिप सदस्य किरण पारधी यांनी बाधितांना काढण्यासाठी आपल्या परीने सर्व व्यवस्था व उपाययोजना केली.    शेतकर्‍याचे 3.55 लाखाचे नुकसान  

अतिवृष्टीचा फटका

अतिवृष्टीमुळे सोनोली येथील नाल्याचा जलस्तर वाढला. त्या नाल्याला लागून पुणेश सुखदेव ठाकरे यांचे शेत आहे. सदर शेतात ठाकरे यांचे 3 म्हशी, म्हशींचे 3 बछडे, 10 कोंबड्या होत्या. मौक्यावर पाहणी करताना नाल्याचे प्रवाहीत पाणी या शेतात आल्यामुळे शेतातील सदर जनावरे पाण्यात बुडून मरण पावले. तिन्ही म्हशी गरोदर असल्याचे आढळून आले. सदर म्हशींची बाजारभाव किंमत 85 हजार रुपये प्रत्येकी याप्रमाणे 2 लाख 55 हजार रुपये, बछड्यांचे अंदाजे किंमत 25 हजार रुपये प्रत्येकी याप्रमाणे 75 हजार रुपये, कोंबड्यांची किंमत प्रत्येकी 500 रुपये याप्रमाणे 5 हजार रुपये, शेतीचे खत अंदाजे 15 हजार रुपये व कीटकनाशके अंदाजे 5 हजार रुपये असे एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचे अतिवृष्टीचा फटका बसून नुकसान झाले आहे.आज गुरुवार, 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तलाठी नरेश उगावकर यांनी सदर घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी जिप सदस्य किरणकुमार पारधी, कुवरलाल मोहारे, भुराज मोहारे, गोपाल ठाकरे, पृथ्वीराज लिल्हारे व गावकरी उपस्थित होते. सदर नुकसानग्रस्त शेतकर्‍याला शासनाने तात्काळ मदत करावी, अशी मागणी जिप सदस्य किरण पारधी यांनी केली आहे.