भाजप महिला मोर्च्याच्यावतीने साकोली पोलिस ठाण्यात रक्षाबंधन

0
29

साकोली,दि.11ः रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष महिला मोर्च्याच्यावतीने साकोली पोलीस स्टेशन येथे आज(दि.11) रक्षांबंधन कार्यक्रम आयोजीत करण्यात करुन पोलीस विभागात कार्यकरणार्‍या बंधुना रक्षासुत्र बांधुन व मिठाई भरवुन समाजातील त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत महीलाच्या संरक्षणासाठी विनंती करण्यात आली.पोलिस स्टेशनचे ठाणेदार जितेद्र बोरकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास भाजप महिला आघाडी अध्यक्ष इंद्रायणी कापगते यांच्या अध्यक्षतेखाली व भाजपा प्रदेश सदस्य तसेच भंडारा जिल्हा प्रभारी महिला मोर्चा रचना गहाणे, प्रदेश सदस्य रेखा भाजीपाले,माजी नगराध्यक्ष धनवंता राऊत,जिल्हा परिषद सदस्या महेश्वरी नेवारे,जिल्हा परिषद सदस्या सौ.डोये,प्रिती डोंगरवार,गिता कापगते,आशा शेंडे,उषा डोंगरवार,भिमा पटले,वर्षा परमार,विद्या खेडीकर,शकुतंला गिरेपुंजे,मिना लांजेवार,भुमिका डोगंरवार,लता कापगते,गायत्री टेंभुर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.