37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ अन् ड्रोनने आकाश्यात झेप घेतली पवनी /धाबेतून 8 गावचे ड्रोन सर्वे पूर्ण

अन् ड्रोनने आकाश्यात झेप घेतली पवनी /धाबेतून 8 गावचे ड्रोन सर्वे पूर्ण

0
41

blank

अर्जुनी /मोर ता 15:– ग्रामस्थांना जंगम मालमत्ता अधिकार पत्र बहाल करण्याच्या अनुषंगाने ड्रोनद्वारे सर्वे सुरु असून ड्रोन यंत्राने पवनी /धाबे गावावरून आकाशात झेप घेतल्याने परिसरातील लोकांचा आनंद गगनात मावेनाषा झाला. या ड्रोन यंत्राद्वारे  बुधवारी (ता.14) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि स्वामी विवेकानंद आश्रम शाळेतून उडान भरली. दरम्यान गावठाण मोजमाप करण्यात येवून परिसरातील पवनी /धाबे, धाबेटेकडी, रामपुरी, येलोडी, जांभळी, कोहलगाव, रांजीटोला आणि कान्होली अश्या 8 गावातील जंगम मालमत्ता मोजमाप करून नकाशा तय्यार करण्यात आला. सर्वेअर रामनरेश यादव यांच्या नेतृत्वातील चमुने ही कामगिरी पार पाडली.
दरम्यान यावेळी उपस्थित सरपंच श्रीमती पपीता नंदेश्वर यांनी सांगितले की,या सर्वेमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.ड्रोन द्वारे गावठाण जमिनीचे मोजमाप करण्यात येत असल्यामुळे ग्रामस्थांना प्रॉपर्टी कार्ड मिळेल.तसेच त्यांच्या हक्काच्या मालमत्तेचे ते मालक होतील असा विस्वास त्यांनी व्यक्त केला.
ड्रोनच्या कामगिरीची माहिती देतांना सर्वेअर श्री यादव यांनी सांगितले की, सर्वप्रथम लॅपटॉप वरून गुगलच्या ऍप मध्ये संबंधित त्या गावांचा नकाशा काढला जातो. ही माहिती ड्रोनच्या कॉम्पुटरमध्ये पाठविली जाते. या माहितीनुसार नकाशातील अक्षांस आणि रेखान्स वरून हा ड्रोन फिरून माहिती गोळा करतो.छायाचित्र संकलित करतो.या ड्रोनची गती एका सेकंदाला 8 मीटर एवढी असते.अत्यंत मौल्यवान असा यंत्र आहे अशी माहिती त्यांनी दिली.

blank