
सडक अर्जुनी:– तालुक्यातील धानोरी येथे मागील झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांची व गोठयाची पडझड झाली होती. यामध्ये अनेकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाली आहे.२७ सप्टेंबर रोजी माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून चौकशी केली आणि झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.तसेच जिल्हा परिषद शाळेला भेट देत होत असलेल्या पावसामुळे वर्गखोली गळत असल्याचे निदर्शनास आले असता वर्गखोलीकरीता निधी उपलब्ध करून देण्याबाबत आश्वासित केले.यावेळी पंचायत समिती सभापती संगीताताई खोब्रागडे,उपसभापती शालिंदर कापगते,पंचायत समिती सदस्य निशाताई काशिवार,धानोरी चे सरपंच प्यारेलाल पारधी,शिशिर येळे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास बागडकर,क्षेत्र प्रमुख गौरेश बावनकर,विनोद काशीवार,झामाजी पटले, यांच्यासह पदाधिकारी,तलाठी,ग्रामसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.