क्षयरोग कंत्राटी कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू

0
18

गोंदिया-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमातून कंत्राटी कर्मचार्‍यांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्या अनुषंगाने १३ सप्टेंबरपासून काळीफिती लावून शासनाचा निषेध नोंदवित आहेत. दरम्यान मागण्यांची पुर्तता न झाल्यास कामबंद करण्याचा इशारा जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केला होता. दरम्यान मागण्यांची पुर्तता न झाल्याने  (ता.२९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद करून धरणे आंदोलनाला सुरूवात केली आहे.
मागील २५ वषार्पासून क्षयरोग कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचार्‍यांना सरसकट सेवा समावेशन करण्यात यावे, त्रीसदस्यीय मंत्री समितीने कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांच्या संदर्भात शिफारस केलेला अहवाल राज्य शासनाने स्विकारावा, जुन्या व वरिष्ठ कर्मचार्‍याना योग्य वेतनवाढ देण्यात यावी, मृत्यू व अपघात झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत देण्यात यावी, शासनाच्या कोणत्याही भत्त्यात १५ वषार्पासून वाढ झाली नाही, ती वाढ करण्यात यावी, कार्यक्रमातील कर्मचार्‍यांवर वार्षिक आर्थिक कृती आराखड्यामध्ये सुधारणा करून तफावत दूर करण्यात यावी, या मागण्यासांठी हे आंदोलन सुरू आहे. त्यातच १३ ते २८ सप्टेंबरपयर्ंत काळीफिती लावून कर्मचारी कर्तव्य पार पाडत आहेत. तर दुसरीकडे २९ व ३0 सप्टेंबर रोजी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. तसेच १ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत संपुर्ण कामबंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुसंगाने मागण्यांची पुर्तता न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष पवन वासनिक, भोजेंद्र बोपचे, अमित मंडल, योगिता अळसर, रामचंद्र लिल्हारे, संजय रेवतकर, संजय भगवतकर, हरिश चिंतालोरे, रिजवाना शेख, देवेंद्र भाजीपाले, मंजुश्री मेर्शाम यासह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले.