आमदार कोरोटे यांच्या हस्ते १ कोटी २३ लक्ष रूपयाच्या विकास कामाचे भुमिपूजन.

0
17

 पिपरीया पं.स. क्षेत्रात  १२ सिमेन्ट रोडच्या बांधकामाला सुरूवात

सालेकसा,ता.०६: तालुक्यातील पिपरीया पं.स. क्षेत्रात विवीध योजने अंतर्गत मंजूर झालेले १ कोटी २३ लाख रूपयाच्या निधीचे एकूण १२ नवीन सिमेन्ट कांक्रेट रोड बांधकामाचे भुमिपूजन रविवार(ता.२ आक्टोंबर ) रोजी आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते पार पडले.
यात पिपरीया पं.स.क्षेत्रा मधील रोंढा ग्रा.पं.अंतर्गत ३ सिमेन्ट रोड- २७ लाख रूपयाचे,निंबा ग्रा.पं.अंतर्गत २ सिमेन्ट रोड- १५ लाख रूपयाचे, कहाली ग्रा.पं. अंतर्गत २सिमेन्ट रोड- २० लाख रूपयाचे तर पिपरीया ग्रा.पं. अंतर्गत गल्लाटोला २ सिमेन्ट रोड व रामाटोला,निमटोला,कारूटोला येथे प्रत्येकी एक रोड- ५० लाख रूपयाचे असे एकूण १२ सिमेन्ट कांक्रेट रोडाचे १कोटी २३ लाख रूपयाच्या नवीन बांधकामाचे शुभारंभ करण्यात आले आहे.
या भुमिपूजन प्रसंगी जि.प.सदस्य गिताताई लिल्हारे, महिला व बालकल्याण समिती च्या माजी सभापती लताताई दोनोडे, सालेकसाचे सभापती प्रमिलाताई गणवीर, उपसभापती संतोष बोहरे, पं.स.सदस्य जितेन्द्र वल्हारे, पं.स.सदस्य विनाताई कटरे, वरिष्ठ कार्यकर्ता गुणाराम मेहर, कैलास अग्रवाल, ओमप्रकाश ठाकरे, जि.यु.कां.चे महसचिव ओमप्रकाश लिल्हारे, सक्रिय कार्यकर्ता दिपक अग्रवाल, गणवीर सर, राजेश सोनवाणे, प्रल्हाद बहेकार, व्यकंट कोंबे, भरत लिल्हारे, गेंदलाल चौधरी, रोशन सलामे, गोविंद रत्नाकर, सुनील पगरवार, संदिप लिल्हारे, कैलास भुरकुडे, किशोर दसरिया, प्रदिप चौरागडे, नितीन गुप्ता, दिलीप गावड, रोंढा येथे सरपंच प्रमोद कोटांगले, उपसरपंच रिना रंगारी, पो.पाटिल ममता शोहोरे, महिला कार्यकर्ता पारबता मच्छिरके, जयश्री कोटांगले, पुष्पा लिल्हारे, भुवन नागपूरे, विजय नागपूरे, सुनील बहेकार, भैय्यालाल नागपूरे यांच्यासह सालेकसा तालुक्यातील कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.