विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. अग्रवाल

0
35

पोवार बोर्डिंग येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन
गोंदिया : ़कोणतेही कामे करण्यासाठी इच्छा शक्तीची गरज असते. शिवाय संघटनेचे पाठबळ ते अत्यंत महत्वाचे असते. त्याच अनुषंगाने समाजाच्या विकासासाठी आपण तत्पर राहू तसेच स्थानिक पोवार बोर्डिंग येथे विकासासाठी निधीची कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली. ते पवार प्रगतीशील मंचच्या वतीने आयोजित रास गरबा कार्यक्रम दरम्यान ठेवण्यात आलेल्या ६० लाख रुपयाच्या कामाचे भूमिपूजन प्रसंगी समाज बांधवांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, माजी नगराध्यक्ष कशीश जायस्वाल, उपाध्यक्ष शिव शर्मा, घनश्याम पानतवने, बाबा बिसेन, अनिल रहांगडाले, सुरेंश भक्तवर्ती तसेच समाज बांधवांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडला. पवार प्रगतीशील मंचच्या वतीने रास गरबा कार्यक्रम दरम्यान ३ ऑक्टोबर रोजी भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार अग्रवाल यांनी नगरोथान योजनेंतर्गत ६० लाखाच्या विकास कामांना मंजुरी दिली. त्या कामाचे भूमिपूजन आयोजित होते. पुढे बोलतांना अग्रवाल यांनी संघटनेशिवाय कोणतेही कार्य शक्य नाही, संघटनेमुळेच आज निधी देणे मला भाग पडले. शिवाय या पुढेही या भवनाच्या इतर कामासाठी लागणार्‍या निधीची आपण तरतुद करू अशी ग्वाही दिली. आयोजित कार्यक्रमाला माजी अध्यक्ष संजय रहांगडाले, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, सचिव किशोर भगत, मंचचे उपाध्यक्ष पन्नालाल ठाकरे, राजेश चव्हाण, हेमंत बघेले, सुरेश पटले, डॉ. प्रिती गौतम, सौ. रश्मी रहांगडाले, पंकज पटेल, महेंद्र बिसेन, छत्रपाल चौधरी, रास गरबाचे संयोजक योगेश ठाकरे, दिपक देशमुख, योगी येडे, अजीत टेंभरे, विक्की बघेले तसेच महिला समितीच्या सदस्य उपस्थित होते.