येत्या रविवारी देवरीत दमा आजारावर औषध वितरण शिबीर

0
23

 देवरी, दि.09 – येत्या रविवारी (दि.9) देवरी येथे मॉ धुकेश्वरी मंदीर समिती, सुवर्ण प्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मोफत औषधी वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 स्थानिक माँ धुकेश्वरी मंदिर सभागृहात येत्या रविवारी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत आयोजित शिबीरातून दमा,जुनाट सर्दी,खोकला,एलर्जी असे आजारावर मोफत आयुर्वेदिक औषध वितरण करण्यात येणार आहे. या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन या शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन माँ धुकेश्वरी मंदिर समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रशांत संगीडवार, सुवर्णप्राशन फाऊंडेशन अध्यक्ष डॉ सुनील समरीत, आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार यांनी केले आहे.