खंडविकास अधिकारी वाडेकर यांना हटवा

0
15

मोहाडी-स्थानिक पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी पल्लवी वाडेकर ह्या स्वत: मनर्मजीने काम करीत असल्याने त्यांना तात्काळ हटविण्याची मागणी सभापती रितेश वासनिक यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे .
खंडविकास अधिकारी ह्या पदाधिकार्‍यांना न जुमानता आपल्या मनर्मजीने पंचायत समिती चालवुन माया गोळा करीत आहेत. एक दोन दिवसापुर्वी सभापती हे जनतेनी दिलेल्या समस्यांच्या निवेदनाचे निराकरण झाले किंवा नाही याबाबत चर्चा करण्यासाठी बीडीओंच्या कक्षात गेले असतांना गटविकास अधिकारी यांनी ‘मी माझा मी पाहीन काय करायचे आहे ते’ असे बोलून त्यांनी सभापतीचा अपमान केला, तेव्हा सभापतीनी आपणाकडे पाचगाव येथील ग्रामसेवकाची लोकांनी तक्रार केलेली आहे. आणि त्या ग्रामसेवकाने विनंती अर्ज करून त्यांचाकडे असलेला पाचगाव ग्रामपंचायचा अतिरिक्त कार्यभार काढण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या संदर्भात सभापतींनी विस्तार अधिकारी यांना पाचगाव येथील ग्रामसेवकाचा अतिरिक्त चार्ज काढण्यात यावा. त्यावेळी विस्तार अधिकारी यांनी सांगीतले की, अतिरिक्त कार्यभार काढण्याबाबतची नस्ती गटविकास अधिकारी यांच्या टेबलवर आहे. याबाबत सभापती यांनी बीडीओ शी चर्चा केली आणि आ. राजू कारेमोरे यांनी सदर प्रकरणात गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर कळविले. तसेच वरिष्ठ सहाय्यक राऊत यानी सांगीतले की, पाचगाव येथे दुसरा ग्रामसेवक देण्यात आला असून नस्ती मंजुर करुन आदेश काढण्यात आलेले आहे व सदर आदेशावर जावक रजिस्टर वर नंबर ही चढविण्यात आलेला आहे, परंतु अजून पर्यत जावकवर चढविलेला पत्र मला मिळालेला नाही आणि त्या संदर्भात गटविकास अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी ‘माझ्याकडे ती फाईल नाही व ते पत्रही नाही’ विना सही केल्याने सदर पत्र जावक रजिस्टर वर कसे चढविले ? असा प्रश्न: सभापतीनी उपस्थित केला. पंचायत विस्तार अधिकारी व बीडीओ यांनी संगनमत करून, विविध प्रकारे केलेल्या भोंगळ कारभाराची चौकशी करून, त्यांना तात्काळ हटविण्याची मागणी मोहाडी पंचायत समितीचे सभापती रितेश वासनिक यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. पत्रकार परिषदेला पं.स.सदस्य बाणा सव्वालाखे उपस्थित होते.