कन्हाळगांव येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

0
27

देवरी,दि.12- तालुक्यातील कन्हाळगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन अंतर्गत देवरीच्या दिनबंधु ग्रामीण विकास संस्था  आणि तालुका आरोग्य अधिकारी देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंतनाशक दिन (दि.10)मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला.

कन्हाळगांव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फुटाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दोषांत हुमणे हे होते. यावेळी दिनबंधू ग्रामिण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीर लांजेवार, मुख्याध्यापक प्रकाश शहारे, सीएचओ मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य मिशन अंतर्गत समाजातील सर्व जनतेचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी सर्वोतोपरी लोकाभिमुख उपक्रमाचे आयोजन करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते,त्या अंतर्गत लहान बालकांना लहान पणा पासून रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या हेतूने राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून यावर्षी देशभरात जंतनाशक मोहीम आयोजित करण्यात आली होती.

दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना आयोजकांकडून केळी वितरीत करून जंतनाशक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यापक शहारे यांनी तर संचालन व आभार टी. के.मातवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरेंद्र खोटोले, जीवन आकरे, प्रकाश गावडकर,नागेश कसोंदि यांच्यासह संस्थेच्या आणि आरोग्य विभागाच्या सहकार्यांनी सहकार्य केले.