देऊळगाव येथे अंगणवाडी ईमारतीचे भुमिपुजन संपन्न

0
20

अर्जुनी मोर. :- तालुक्यातील देऊळगाव/बोदरा येथे या क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या पोर्णिमा उमाकांत ढेंगे यांच्या पुढाकाराने जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नऊ लाख चाळीस हजार रुपये मंजूर निधीतून अंगणवाडी ईमारतीचे भुमिपुजन जि.प.सदस्या पोर्णिमा ढेंगे यांचे हस्ते ता.11 ऑक्टोबर रोजी करण्यात आले .
भुमिपुजन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने होते.यावेळी सरपंच शंकर उईके, उपसरपंच गजानन शहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य उमाकांत ढेंगे, खरेदी विक्री समिती चे संचालक लैलेश्वर शिवनकर, महेंद्र बोरकर, हरिचंद्र ढवळे,भास्कर कवरे,मुख्या. यु.ई.चांदेवार, एस.एस.शहारे, अंगणवाडी सेविका किरण झोळे, ग्रा.पं.सदस्या मंगला वटी,देवका खोटेले,अंगणवाडी मदतनीस विद्या राऊत, रामाजी सोनवाने, ताराचंद झोळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोर्णिमा ढेंगे म्हणाल्या की,इटखेडा जिल्हा परिषद क्षेत्रातील मतदारांनी मला भरघोस मतांनी निवडून दिले. त्या मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही देवुन नव्याने तयार होत असलेल्या या अंगणवाडी इमारतीमधे लहान बालकांना संस्कारामय वातावरण मिळुन पोषण आहाराचे माध्यमातून बालकांचे आरोग्य सुद्ढ ठेवण्यासाठी मदत होणार आहे. यापुढेही क्षेत्राच्या विकासासाठी आपन कटीबध्द राहु असे आश्वासन दिले.