देवरीतील बीआरसी गेटसमोर चिखलाचे साम्राज्य

0
27

तुंबलेल्या पाण्याच्या दुर्गंधीचा परिसरातील नागरिकांना त्रास

देवरी,दि.12- स्थानिक गटसाधन केंद्राच्या गेटसमोर टाकलेल्या मातीमुळे पावसाच्या पाण्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी, या साचलेल्या पाण्याला घाण वास सुटल्याने परिसरात वावरणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सविस्तर असे की, देवरीतील शिक्षण विभागाच्या महत्वाच्या कामासाठी प्रसिद्ध असलेल्या गटसाधन केंद्रासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर माती आणून टाकली. या मातीचे सपाटीकरण न केल्याने तेथे पावसाचे पाणी चांगलेच तुंबले आहे. त्यामुळे या पाण्याला घाण वास सुटली असून त्याचा त्रास तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसह तिथे वावरणाऱ्या आणि ये-जा करणाऱ्या इतर नागरिकांना सुद्धा होत आहे. या साचलेल्या पाण्याची वास एवढी घाण आहे की त्यामुळे त्या वासाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता अनेक नागरिकांनी वर्तवली आहे. याशिवाय त्या रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना सुद्धा याचा फटका बसत आहे.