आलेवाडाच्या डॉ. आंबेडकर विद्यालयात जंतनाशक गोळ्याचे वितरण

0
31

देवरी,दि.12 –  तालुक्यातील आलेवाडा येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात आरोग्य विभागाच्या वतीने गेल्या सोमवारी (दि.12) जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले.

या विद्यालयामध्ये शासनाच्या वतीने जंतनाशक गोळ्यांचे वाटप इयत्ता 5 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. विद्यार्थ्यांचे कुपोषण होऊ नये, त्यांना थकवा जाणवू नये तसेच त्यांची शारीरिक वाढ व मानसिक वाढीवर परिणाम होऊ नये. यासाठी जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
जंतनाशक गोळ्याचे विदयार्थ्यांना वाटप करताना मागासवर्गीय विश्वभारती शिक्षण संस्था लाखनी या संस्थेचे संचालक मा. जे.एस.वासनिक, शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही.झेड.गिऱ्हेपुजे तसेच आरोग्य विभागाच्या आरोग्य समुदाय अधिकारी शेलार मॅडम व आरोग्य सेविका खरवडे मॅडम प्रामुख्याने उपस्थित होते.