रानडुकरांमुळे होणाऱ्या नुकसानीची उपाययोजना करा; आ.विजय रहांगडाले

0
23

तिरोडा : राज्याचे वने व सांस्क्रुतिक मंत्री तसेच गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली १० ऑक्टोबरला जिल्हा वार्षिक योजनेची आढावा सभा घेण्यात आली. या सभेमध्ये विधानसभा सदस्य हे सदस्य असून विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी यांना प्रश्न उपस्थित करून त्यावर उपाययोजना अध्यक्ष महोदय सूचना देत असतात.

तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रानडुकरांच्या हैदोशामुळे शेतकरी त्रस्त असून ऐन धानपिक कापणीच्या वेळी मोठया प्रमाणात धानाचे नुकसान या प्राण्यामार्फत होते. तसेच शेतकऱ्यांनी धानपिकाचे साठवण करून दिल्यानंतरही नुकसान करित असतात. रानडुकरांच्या हैदोसामुळे बांधावर तूरपिक लावण्याचे प्रमाण कमी झाले असून याची उपाययोजना करणे अति गरजेचे आहे. जिल्ह्यातील शेतकरी रानडूकरांमुळे त्रस्त झाला असून वारंवार वन विभागाकडे तसेच लोकप्रतीनिधीकडे  यावर उपाययोजना करण्याबाबत शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. सदर प्रश्न गांभीर्याने घेवून उपाययोजना करण्याबाबत तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी वनमंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडे मागणी केली.

तसेच नागरी व ग्रामीण क्षेत्रात कित्येक वर्षापासून वस्ती करून राहणाऱ्या लोकांची पक्के घरे आहेत. शासकीय कार्यालय आहेत. अशा जागेवर वनविभागार्फ झुडपी जंगल नोंद असल्यामुळे त्यांना हक्क बजावता येत नाही व शासकीय कार्यालयात विकासकामे मंजूर करण्यामध्ये अडचणी उदभवत असतात. तेव्हा अशा कायमस्वरूपी वस्ती करणारे तसेच शासकीय कार्यालयातील जागेवरील झुडपी नोंद कमी करण्याबाबतची मागणी आमदार रहांगडाले यांनी केली आहे.

तसेच बोळून्दा पोंगेझरा येथे इंग्रजकालीन शिव मंदिर स्थित असून या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठया प्रमाणात तालुक्यातील भावीक दर्शनाला येतात. या ठिकाणी विकासकामे होण्यासाठी दिनांक ३०/०१/२०१८ च्या जिल्हा नियोजन बैठ्कीमध्ये आमदार महोयांनी पोंगेझरा तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा देण्याबाबत मागणी केली होती. सदर बैठकीमध्ये पोंगेझरा तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा देण्यास मान्यता दिली होती. परंतु सदर नोंद जिल्हाधिकारी यांच्या यादीमध्ये घेण्यात आली नाही, ही बाब निदर्शनास आणून दिली व त्यावर अध्यक्ष महोदयांनी तीर्थ क्षेत्र क वर्ग यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले.