२०२४मध्ये कॉंग्रेस संपणार, घडी बंद होणार  

0
58
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास
गोंदिया जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी केला विजयाचा संकल्प
गोंदिया, दि. १२ : जगातला सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा संकल्प घेऊन काम केल्यास कॉंग्रेस पक्ष २०२४ च्या निवडणुकीत संपेल तर राष्ट्रवादीची घडी बारामतीतूनच बंद करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोंदिया येथील जलाराम लॉन येथे आयोजित भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केला.
 
भाजपा कार्यकर्त्यांनी ‘हार्ट-टू-हार्ट व मॅन टू मॅन काम’ करावे असाही सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला व नवचैतन्य संचारणारे मार्गदर्शन केले. श्री बावनकुळे म्हणाले, ज्या पक्षासाठी आपण काम करीत आहोत, तो १८ कोटी सदस्य असलेला जगातला सर्वांत मोठा पक्ष आहे. पक्षाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना जगातील १५० हून अधिक देशांनी त्यांचा नेता म्हणून मान्यता दिली आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असणारे हे जुळे सरकार आहे. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. जनहिताची कामे होणारच यात कोणतिही शंका नाही. एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच ओबीसी आरक्षणाचा रखडलेला मुद्दा सोडविला व आरक्षण मिळवून दिले. हेच सरकार आता धानाचा बोनस मिळवून देणार आहे.
 
श्री बावनकुळे म्हणाले, मतदारांच्या कमळाचे बटन दाबल्यानेच काश्मिरमधून ३७० कलम हटले, अयोध्येत श्री राम मंदिराचे निर्माण होत आहे. जगात परसलेल्या कोरोना महामारीवर भारताला विजय मिळविता आला आहे, ही कामे अशीच सुरू राहवी यासाठी पक्षासाठी केवळ दोन तास मेहनत करून १०० कार्यकर्ते जोडले पाहिजे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २५-२५ कार्यकर्त्यांचा प्रवेश भाजपात करावा, पंतप्रधान मोदीजींच्या योजनांचा लाभ घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी २० घराचे पालकत्व घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.
 
कार्यकर्ता मेळाव्यात विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, खासदार सुनील मेंढे, खासदार अशोक नेते, आमदार परिणय फुके, आमदार विजय रहांगडाले, भंडारा-गोंदिया चे संघटन मंत्री वीरेंद्र अंजनकर, गोंदिया भाजपा जिल्हाध्यक्ष  केशवराव मानकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, पंकज रहांगडाले, हेमंत पटले यांच्यासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेले भाजपा पदधिकारी उपस्थित होते.
 
नेत्यांनी मोटारसायकलवरून फिरावे
भाजपाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी लोकापर्यंत पोहचण्यासाठी मोटारसायकलवरून फिरून पोहचले पाहिजे असे आवाहन करीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या बैठकी तात्काळ घ्याव्या असे आवाहन त्यांनी केले. ‘धन्यवाद मोदीजी’ या उपक्रमात गोंदिया जिल्ह्यातून १ लाख पत्रे पाठविण्याचे आवाहन करीत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. सरकारच्या लोकहिताच्या योजना पोहचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा असेही सांगितले.
दिवसभर भरगच्च कार्यक्रम
गोदिया जिल्हा दौऱ्यात त्यांनी दिवसभर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. भाजपाची संघटनात्मक बैठक, सोशल मीडिया टीमसोबत संवाद साधाला. बुथ कमेटी मिटिंगला घेतली. युवा वॉरिअर शाखेचे उद्घाटन केले. विविध सामाजिक संस्था व व्यक्तिंशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा शब्द दिला.