रक्तदान शिबीर आयोजीत करुन सुदृढ रक्तदात्यांना सहभागी करून घ्या- अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे

0
13

राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिवस

रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार   

गोंदिया,दि.१३ मोठ्या संख्येने रक्तदान शिबीर आयोजीत करुन सुदृढ रक्तदात्यांना सहभागी करुन वर्षाला चार ते पाच हजार युनिट होणारे रक्तसंकलन दहा हजार होणे अपेक्षित आहे. जेणेकरुन आपले रक्तकेन्द्र मॉडेल रक्तकेन्द्र बनेल असे प्रतिपादन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी केले. ते राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिन कार्यक्रमात बोलत होते.

            डॉ.व्ही.पी. रुखमोडे विभागप्रमुख शरीर रचनाशास्त्र, डॉ. नंदकिशोर जयस्वाल वैद्यकीय अधिक्षक डॉ. हातेकर विभागप्रमुख शरीरक्रियाशास्त्र, डॉ. शैलेंद्र यादव विभागप्रमुख विकृतिशास्त्र, डॉ. प्रविण जाधव, सहयोगी प्राध्यापक शरीरक्रियाशास्त्र, डॉ. संजय चव्हाण प्रभारी बी. जी. डब्ल्यु रुग्णालय रक्तकेन्द गोंदिया, डॉ. सागर सोनारे वैद्यकिय अधिक्षक बी. जी. डब्ल्यु रुग्णालय गोंदिया आणि डॉ. सुवर्णा हुबेकर वैद्यकिय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय स्वैच्छीक रक्तदान दिनाविषयी जनजागृती करण्याकरीता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांव्दारे उदघोषणा देत सिव्हील लाईन ते जयस्तंभ चौक गोंदिया व रुग्णालयीन आवारात प्रभातफेरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हयातील नियमीत रक्तदान शिबीर आयोजन करणाऱ्या ७५ विविध संस्था, ट्रस्ट व मंडळ, यांचा गौरव चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. संजय चव्हाण प्रभारी रक्तकेंद्र यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक मध्ये सांगीतले की रक्त हे कोणत्याही कारखाण्यात, प्रयोगशाळे मध्ये तयार होत नाही कींवा शेतात उगत नाही तसेच पशु प्राण्यांचे ही रक्त मानवाला चालत नाही तेव्हा रक्ताचा एकमात्र विकल्प म्हणजे मानवच आहे. रक्तदानाचे मानविय जीवणात कीती मोलाचे योगदान व महत्व आहे ही जनजागृती करण्याकरीता हा राष्ट्रीय स्वेच्छीक रक्तदान दिवस साजरा करण्यात येतो. आज देशात एक हजार सुदृढ रक्तदात्यांपैकी फक्त ४ व्यक्तिच स्वच्छेने रक्तदान करतात ही संख्या ८ व्हायला पाहीजे असेही त्यांनी आवर्जुन सांगितले. या प्रसंगी कार्यक्रमात उपस्थित शिबीर आयोजक विनोद चांदवाणी, आदेश शर्मा, ओम कटरे, सौरभ रोकडे, कुलदिप लांजेवार, सुभाष जैन इत्यादिनी सुदधा त्यांना शिबिर आयोजनासाठी येणाऱ्या तांत्रिक व इतर अडचणी सांगीतल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी उपस्थितांच्या समस्येचे निराकरण करुन सांगितले की लवकरच रक्तकेन्द्रात ब्लड कम्पोनेट सुरु होणार आहे तसेच रक्तकेन्द्रा करीता ब्लड मोबाईल वाहन देखील मंजुर झालेले आहे. अधिष्ठाता आणि रक्तकेन्द्र प्रभारी यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबीर आयोजीत करुन सुदृढ रक्तदात्यांना सहभागी करुन वर्षाला चार ते पाच हजार युनिट होणारे रक्तसंकलन दहा हजार होणे अपेक्षित आहे. जेणेकरुन आपले रक्तकेन्द्र मॉडेल रक्तकेन्द्र बनेल. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. पल्लवी गेडाम रक्तसंक्रमण अधिकारी यांनी केले तर आभार प्रदर्शन अजय डोंगरे समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय) यांनी केले. विनोद बनसोड व कु. पल्लवी रामटेके यांनी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता रक्तकेंद्रातील बि.टी.ओ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, स्टाफ नर्स व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.