हत्तींचा कळप वडसा वन विभागातील पुराडा वनक्षेत्रात दाखल

0
58

कुरखेडा दि.१५:: गोंदिया जिल्ह्यातील धानाची व घरांची नासधुस केलेला 33 हत्तींचा कळप सद्या गडचिरोली जिल्ह्याच्या पुराडा वनक्षेत्रातील हाडकीकन्हार दक्षिण बिटाचे कक्ष क्रमांक 177 मध्ये दाखल झाला असून सदरील कळपाने सिंदेसुर व पिटेसुर या गावातील धान शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान केलेले आहे. . बालाजी डिगोळे वन परिक्षेत्र अधिकारी पुराडा,. कामचंद ढवळे क्षेत्र सहायक,  गंगाराम मेने बिटरक्षक, . शामराव कुळमेथे बिटरक्षक हे रात्रंदिवस गस्ती करून हत्तींच्या सनियंत्रनाचे काम करत लोकांमध्ये जनजागृती सुध्दा करत आहेत.