गोंदिया वृत्तपत्र विक्रेता संघाने केली माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम जयंती साजरी

0
10

गोंदिया :- आयुष्यात परिस्थिती कशीही असो पण जेव्हा तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करायचे ठरवले, तेव्हा ती पूर्ण करूनच जगता, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे हे विचार आजही तरुण पिढीला पुढे जाण्याची प्रेरणा देत आहेत. भारतरत्न, मिसाईल मॅन अशा महान व्यक्तिमत्वाचे मालक एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज गोंदिया वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे सन्मान करण्यात आला. एपीजे अब्दुल कलाम यांनी बालपणातील संघर्षमय दिवसांमध्ये काही दिवस वृत्तपत्र विक्रीचे कामही केले. त्यामुळे कलाम साहेबांचा जन्मदिवस वृत्तपत्र दिन म्हणूनही साजरा केला जातो. शनिवार 15 ऑक्टोबर रोजी एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून मिठाई वाटण्यात आली. यावेळी वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश वैद्य, प्रमोद भोयर, दिनेश उके, हर्षदीप उके, सतीश बघेले, भंडारे, पंकज दमदार, संदीप बिसेन, रमेश भोयर, हेमंत हलमारे, राकेश मेश्राम, राज रणदिवे, हितेश अजित ,पीयूष सोनवणे, सचिन, प्रवीण कोचे, रमाकांत वैद्य, शैलेंद्र ठाकूर, राजू द्वारे, केवल लांजेवार यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.