गोंदिया जि.प.पं.स.सहकारी पतसंस्थेवर सहकार पॅनलची सत्ता

0
294

गोंदिया,दि.17ः-  गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या. र.नं. 102 निवडणुकीवर असलेली स्थगिती राज्य शासनाने उठविल्यानंतर अर्धवट राहिलेल्या गोंदिया जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीकरीता 16 आँक्टोंबरला मतदान पार पडले.या निवडणुकीची मतमोजणी आज 17 आँक्टोंबरला जलाराम लाॅन येथे पार पडली .21 संचालकाकरीता झालेल्या निवडणुकीत एकता पँनलची सत्ता उलथवून सहकार पँनलने कब्जा केला़.विशेष म्हणजे सचिव पदावर सहकार पॅनलचे कमलेश बिसेन विजयी झाले असून  एकता पॅनलचे गुणवंत ठाकूर यांचा पराभव केला.तसेच संजय बनकर यांचा पराभव करीत सहकारचे सचिन कुथे विजयी झाले.संस्था स्थापनेपासून एकता पँनलच्या हातात असलेली सत्ता पहिल्यांदा हिसकावून घेण्यात सहकार पँनलला यश आले आहे. २१ पैकी १८ संचालक सहकार पँनलचे निवडून आले.

गोंदिया जिल्हा परिषद मुख्यालय गटातून एकता पॅनलचे चंदू धपाडे व सहकार पॅनलचे आनंद चर्जे  विजयी झाले.तर तिरोडा पंचायत समितीमधून सहकार पॅनलने दोन्ही जागेवर विजय मिळविला.यामध्ये मनोज भुरे व दिलीप शेंडे यांचा समावेश आहे.गोरेगाव पंचायत समिती गटातून एकता पॅनलचे शशीकांत बावनकर यांचा पराभव करीत सहकार पॅनलचे ग्रामसेवक ओ.जी.बिसेन विजयी झाले आहेत.तर गोंदिया पंचायत समिती गटातून सहकार पॅनलचे हंसराज गजभिये व एकता पॅनलचे रवी पटले विजयी झाले.