एक दिवाळी चिमुकल्यांचा आनंदासाठी

0
26

चिचगड-समाज सेवा हीच खरी सेवा लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्हा पोलीस व कॅप लिमिटेड पुणे तसेच डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अति दुर्गम ग्राम पळसगाव येथे गरजू शाळकरी 50 लहान मुला मुलींना टिफिन बॉक्स व पाणी बॉटल वितरित करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर तसेच क्वेस कॉर्प लिमिटेड रवींद्र वाकचौरे व डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा.लि नागपूर मनोज रहांगडाले आणि एपीआय करमळकर पीएसआय सैदाने, दुधमल इंगोले देवरी कार्यालयाचे श्रीमती रेखा धुर्वे , रमेश मोहुर्ले , चंद्रशेखर गणवीर
व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा ह्या सामाजिक कार्याचे पळसगाव येथील गावकरी लोकांनी गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आभार मानले.