गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करताना सावंतवाडी-कोलगाव येथील एक ताब्यात

0
14

बांदा:– गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करताना बांदा पोलिसांनी सावंतवाडीतील एकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सायंकाळच्या सुमारास शेर्ले-आरोसबाग येथे करण्यात आली. गणपत प्रभाकर माईनकर (रा.कोलगाव-चाफेआळी), असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून स्विफ्ट कारसह तब्बल ९ लाख ५ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. जी. काळे, पोलीस हवालदार संजय हुंबे व सुधीर बर्डे आदींच्या पथकाने केली. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉🛑👉याबाबत अधिक माहिती अशी की, गणपत प्रभाकर माईनकर हा आरोपी गोवा बनावटीच्या दारुने भरलेल्या बाटल्या आपल्या मारुती सुझुकी कंपनीची swift vdi कार क्रमांक MH-07 Q- 8117 मध्ये भरून गैर कायदा बिगर परवाना आपले ताबे कब्जात बाळगून पत्रादेवी ते सावंतवाडी अशी दारू वाहतूक करत होता. यावेळी बांदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे.यावेळी त्याच्याकडून ४ लाख ५ हजार ५०४ रुपयांची बनावटीची दारू आणि ५ लाखाची स्विफ्ट कार मिळून तब्बल ९ लाख ५ हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर या प्रकरणी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.