
गोंदिया,दि.20ः- पाच वेळा पत्रिका तयार करुन रद्द झालेल्या बहुप्रतीक्षित रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण मोठ्या थाटामाटात बुधवारला(दि.19) संपन्न झाले.या कार्यक्रमाचे लोकार्पण समाजकल्याण सभापती पुजा अखिलेश सेठ (धुर्वे), बांधकाम व अर्थ सभापती संजयभाऊ टेंभरे यांच्या शुभहस्ते,जि.प.उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रिडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
आपण आरोग्य दुत आहोत, रुग्णांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा, ज्याप्रमाणे ईश्वराची सेवा करताना आपण कोणतीच उणीव भासु देत नाही त्याचप्रमाणे रुग्णांना कोणत्याही प्रकारची उणीव भासु देऊ नका कारण रुग्ण सेवा हिच खरी ईश्वर सेवा आपण जी सेवा देत आहात अथवा निस्वार्थ सेवा करत आहात हि अतुलनीय आहे.आपण लोकसेवक आहोत आणि समाजाच्या शेवटच्या घटकाचा सामाजिक राजकीय व आर्थिक विकास कसा होईल याचा विचार करून कार्य करत राहावे. रावणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो,असे प्रतिपादन उपाध्यक्ष गणविर यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्या वैशाली पंधरे,पं.स.सदस्या सरला चिखलोंडे,सुनिता दिहारी, नंदिनी लिल्हारे,रावणवाडीच्या सरपंचा शिला वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, डॉ.दिनेश सुतार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, तथा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा वैद्यकीय सेवा देणारे सर्व कर्मचारी उपस्थित होते.