नवेगाव-नागझिरा निसर्ग पर्यटन ऑनलाईन प्रवेश

0
21

गोंदिया,दि.20 दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पासून नागझिरा अभयारण्याच्या मंगेझरी प्रवेशव्दाराने फक्त ऑफलाईन पध्दतीनेच व सुस्थितीतील निवडक रत्यांनेच पर्यटकांना निसर्ग पर्यटन करता येईल. उपरोक्त पर्यटनाकरीता केवळ जिप्सी पर्यटन वाहनाने ऑफलाईन पध्दतीने प्रवेश दिला जाईल. 01 नोव्हेंबर 2022 पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन ऑनलाईन पध्दतीने नियमितपणे सुरु राहील, याबाबत निसर्ग पर्यटकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया जयरामेगौडा आर. यांनी केले आहे.

          नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन 01 ते 15 ऑक्टोबर, 2022 पर्यत पावसाच्या परीस्थितीनुसार पर्यटन रत्यांची स्थिती पाहून ऑफलाईन पध्दतीने सुरु करण्यात आलेले आहे. या वर्षात सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे काही पर्यटन रस्ते सुस्थितीत नसून त्यांची दुरुस्ती करणे प्रस्तावित आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबर, 2022 पर्यंत नागझिरा व नविन नागझिरा अभयारण्यासाठी पिटेझरी व चोरखमारा प्रवेशव्दार, कोका अभयारण्यासाठी चंद्रपूर प्रवेशव्दार व नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकरीता बकी प्रवेशव्दारावरून ऑफलाईन पध्दतीने व सुस्थितीतील निवडक रत्यांनेच पर्यटन सुरु ठेवण्यात आलेले होते. मात्र सध्यातरी पावसाच्या परीस्थितीनुसार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन रत्यांची स्थिती पाहून 31 ऑक्टोबर, 2022 पर्यत नागझिरा व नविन नागझिरा अभयारण्यासाठी पिटेझरी व चोरखमारा-1 व 2 प्रवेशव्दार, कोका अभयारण्यासाठी चंद्रपूर प्रवेशव्दार व नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकरीता बकी व जांभळी प्रवेशव्दारावरून ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने व सुस्थितीतील निवडक रत्यांनेच पर्यटन सुरु करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे 21 ऑक्टोबर 2022 पासून नागझिरा अभयारण्याच्या मंगेझरी प्रवेशव्दारने फक्त ऑफलाईन पध्दतीनेच व सुस्थितीतील निवडक रत्यांनेच पर्यटकांना निसर्ग पर्यटन करता येईल. उपरोक्त पर्यटनाकरीता केवळ जिप्सी पर्यटन वाहनाने ऑफलाईन पध्दतीने प्रवेश दिला जाईल. 01 नोव्हेंबर 2022 पासून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन ऑनलाईन पध्दतीने नियमितपणे सुरु राहील, याबाबत निसर्ग पर्यटकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन  उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया जयरामेगौडा आर. यांनी केले आहे.