
गोंदिया- जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पत संस्था मर्या,र.न.१०२ ची संचालक मंडळाची सण २०२२ ते २०२७ या कालावधी करीता निवडणूक दिनांक १६/१०/२०२२ ला पार पडली असून सदर निवडणुकीत शैलेश बैस, पी. जी. शहारे व कमलेश बिसेन यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलने एकतर्फी मोठ्या मतांनी विजय मिळवित सत्ता स्थापन केली आहे. या निवडणुकीत एकता पेनलचा दारुण पराभव झाला आहे. सदर संस्थेचा मुख्य कार्यकारी पद हे सचिवांचे आहे व ह्या पदाची निवड थेट निवडणूक द्वारे सर्व सभासद यामधून केली जाते. सहकार पॅनलचे कमलेश बिसेन यांनी एकता पॅनलच्या गुणवंत ठाकूर यांना मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवीत संस्थेवर आपली सत्ता काबीज केली आहे.गोंदिया जिल्हा मुख्यालय मधून आनंद कुमार रामाजी चर्जे,पंचायत समिती गोंदिया मधून हंसराज प्रेमदास गजभिये,पंचायत समिती तिरोडा मधून मनोज वासुदेव भुरे व दिलीप लक्ष्मण शेंडे,पंचायत समिती आमगाव मधून कुवरलाल मोहनराव रहांगडाले,पंचायत समिती सलेकसा मधून रितेशकुमार किशन शहारे,पंचायत समिती गोरेगाव मधून ओमेश्वर गिरधारी बिसेन,पंचायत समिती सडक अर्जुनी मधून वीरेंद्र नत्थुजी कुंभरे,पंचायत समिती अर्जुनी मोरगाव मधून चंद्रशेखर शिवराम चौधरी,पंचायत समिती देवरी मधून अजयकुमार विश्वनाथ रामटेके हे निवडून आले असून अनुसूचित जाती व जमतीमधून मनोज गोंडाने, महिला राखीव गटातून रेखा रत्नकरराव पारधी,प्रेमलता राजेश बागडे,संगीता गोवर्धन बिसेन तसेच वर्ग ४ महिला प्रतिनिधी दीपिका मोहन यादव व भजविज/विमाप्र मधून सुनील खिरशिंग राठोड व इमाव मधून सचिन वसंताजी कुथे हे निवडून आले आहेत. एकविस संचालक मंडळ असलेल्या संस्थेत सुरुवातीलाच सहकार पॅनल चे दोन फॉर्म कापले गेले असले मुळे दोन उमेदवार आधीच एकता पॅनल आले होते त्यामूळे आता सचिव सह 18 संचालक असे एकूण 19 पद करिता निवडणूक झाली ज्यात केवळ एकता पॅनलचे एक संचालक रवी पटले निवडून आले उर्वरित 18 संचालक सहकार पॅनलचे निवडून आले आहेत विशेष म्हणजे सचिव पदावर कार्यरत संजय बनकर यांचाही मोठा पराभव या निवडणुकीत झालेला आहे.
माझ्यावर सभासद यांनी विश्वास ठेवुन माझ्यासह संपूर्ण पॅनल ला मोठ्या मतांनी निवडून दिले असले मुळे निश्चितच माझी जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे पूर्ण प्रामाणिक कामे करून व्याज दर कमी करणे, बंद केलेली कुटुंब कल्याण निधी योजना सुरू करणे, कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांना सभासद करने, आमसभा सुरळीत करून आदरयुक्त स्वक्ष पारदर्शी प्रशासन सह सभासद कल्याणकारी निर्णय घेणे च्या दिशेने कार्य करून सभासद यांचे हित सर्वोपरी ठेवण्याची जबाबदारी मी पूर्ण करणार असून सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही..… कमलेश बिसेन