
नागपूर: झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी ), आणि आयएसओटी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागपुरात अवयवदान कार्यक्रमाचे दशक साजरे करण्यात आले. या कार्यक्रमात, वोक्हार्ट हॉस्पिटल, नागपूरला झेडटीसीसी अधिकार्यांनी या प्रदेशात सर्वाधिक प्रत्यारोपण केल्याबद्दल- (क्रमांक नमूद करा) आणि या प्रदेशातील अवयव दानाच्या क्षेत्रात त्यांच्या दीर्घ आणि समर्पित योगदानाची प्रशंसा केली. वोक्हार्ट हॉस्पिटल केवळ अवयव प्रत्यारोपण करण्यातच नव्हे तर त्याच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवण्यातही खूप सक्रिय आहे. डॉ. महात्मे माजी खासदार, डॉ. विभावरी दाणी – अध्यक्ष आयएसओटी नागपूर झोन, डॉ. संजय कोलते – सचिव, डॉ. अमित पसारी – खजिनदार आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. वोक्हार्ट हॉस्पिटल्सने अनेक प्रत्यारोपणाच्या केसेस केल्या आहेत आणि या प्रदेशात प्रत्यारोपणाच्या अनेक नवीन प्रतिमानांचा आरंभकर्ता आहे. शहरातील ग्रीन कॉरिडॉरची सुरुवात त्यांनीच पहिल्यांदा केली.