आदिवासी गोवारी समाजातर्पेâ गायगोधन पुजन साजरा

0
15

जिल्ह्यात गायगोधन पुजन उत्साहात
गोंदिया : दिवाळी सणाच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धन पुजनाची परंपरा आहे. परंतु, यंदा सुर्यग्रहण असल्याने गोवर्धन पुजनाचा कार्यक्रम आज (ता.२६)  आयोजित करण्यात आला होता.  आदिवासी गोवारी समाज संघटना गोंदिया शाखा व आदिवासी गोंड-गोवारी सेवा मंडळाच्या वतीने संजयनगर, छोटा गोंदिया, सेंद्रीटोला येथे २६ ऑक्टोबर रोजी गोवर्धन पुजा कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी गोवारी संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. आदिवासी गोवारी समाज बांधवांनी पारंपरित पध्दतीने कार्यक्रम आयोजित करून गायगोधन पुजन केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.विनोद अग्रवाल, आदिवासी गोवारी संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत,  दिपक नेवारे, मनोज नेवारे, विशाल नेवारे, अरूण जोशी, सुरज नेवारे, अरूण नेवारे, शशिकांत कोहळे, राजु शेंद्रे, गोकुल बोपचे, प्रविण नेवारे, ओम राऊत आदिंसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी गोवारी समाजाच्या वतीने आदि अनादी काळापासून परंपरा पाळली जात आहे. आदिवासी संस्कृती, डार जागणी, ढाल  पुजन, गायगोधन, गाव नाचणी करून दिवाळी सण साजरा केला. ही परंपरा पिढ्यानपिढ्या पासून सुरू आहे. या अंतर्गत संजयनगर, छोटा गोंदिया व सेंद्रीटोला येथील आखरावर गोवर्धन पुजनाचे कार्यक्रम २६ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात ढाल पुजन करून गोवर्धन पुजा साजरी करण्यात आली.  कार्यक्रमाला गोवारी समाजाचे नागरिकांसह परिसरातील महिला-पुरूषांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी गोवारी समाज संघटन गोंदिया व आदिवासी गोंड-गोवारी सेवा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
०००००
गोंदियात गोवारी समाजाच्या गायगोधन कार्यक्रम जल्लोषात साजरा
गोंदिया :-             दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गायगोधनाचा हा कार्यक्रम साजरा केला जातो, मात्र यावर्षी 25 ऑक्टोबरला सूर्यग्रहण असल्याने बुधवार 26 ऑक्टोबर 2022 रोजी
मरारटोली गोंदिया येथील खिल्या मुठया देवस्थानात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत गोवारी समाजातर्फे गायगोधन कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.  पूजेच्या वेळी समाज बांधवांनी भगवान निसर्गदेवता खिल्यामुठयाचे पूजन केल्यानंतर आखर बांधण्यात आला. त्यानंतर गाय गोधनाचा कार्यक्रमात गाई-वासरांना खेळविण्यात आले व नवजात बालकांना गाईवर आडवे करून लोळविण्यात आला.
यावेळी आदिवासी गोवारी समाज संघटना 268 चे शहराध्यक्ष डी.टी.चौधरी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख उपस्थिती  माजी नगरसेवक घनश्याम पानतावणे, माजी नगरसेवक सचिन शेंडे, नरेश चौधरी, संजू माने, श्री रामजी माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी गोंदिया जिल्हा शाखेचे पदाधिकारी गुलाबराव नेवारे, सी.ए.  आंबेडकर, श्याम शेंद्रे, मोहन शहारे, राधेश्याम कोहले, रतिराम राऊत, अशोक शेद्रे, राजेश नेवारे, पत्रकार संजय राऊत, प्रेमलाल शहारे, आदींनी तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्हाध्यक्ष प्रमोद सहारे ,गोवारी युवा ब्रिगेडचे सचिव विजू भोयर, संघटक प्रवीण चौधरी, जितू वघारे, महेश शेंद्रे, दिनेश कोहळे, रवी भोयर, रवि भंडारी, सोनू नागोसे, राकेश भीमटे, गणेश येसनसुरे, गुड्डू शहारे, रत्नाकर चौधरी, राकेश चौधरी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्या करिता सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन गुलाबराव नेवारे तर आभार विजू भोयर यांनी मानले.

*मुंडीपार येथे पारंपारिक गायगोधन पुजन उत्साहात साजरी.*
गोरेगांव (मुंडीपार):-दिवाळी सणाच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पुजनाची परंपरा आहे.पण यावर्षी सुर्यग्रहण असल्यामुळे परंपरेनुसार आदिवासी गोवारी समाज संघटना मुंडीपार शाखेच्या वतीने बाजारचौक आखरटोली येथे 26 आक्टोंबर रोजी गोवर्धन पुजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आदिवासी गोवारी समाज बांधवांनी पारंपरित पध्दतीने कार्यक्रम आयोजित करून गायगोधन पुजन केले.
पशुधनावर शेती व्यवसाय अवलंबुन आहे त्यामुऴे पशुधनाला अनन्य साधारण महत्व आहे पशुधनाचे संगोपन पालन पोषण जरी शेतकरी बांधव करित असला तरी गो-धनाला रानावणातुन चारावयाला नेवुन त्याची राखण करण्याचे काम आपल्या नावाला सार्थक ठरवित आदिवासी गोवारी जमातीचे लोक फार पुर्वीपासुन करित आहेत.
अलिकडे पशुधन कमी झाले असले तरी परंपरे प्रमाणे गाय गोधन भरविणे कमी झाले नाही सालाबादा प्रमाणे डार  जागणी, ढाल पुजन, ढाल गोधनावर आणणे, गार्यगोधनाची पुजा झाली की लगेचच बिरवा म्हटल्या जाते व डफरी मोठ- मोठ्यांनी वाजवत गोवारी बांधवांची नृत्याला सुरूवात होते त्यांचे बेधुंद नाचणे गावक-यांना आकर्षीत करते गावकरी मनशोक्त आनंद लुटतात अन बोजारा देतात तर सर्व आदिवासी गोवारी जमातीचे लोक ” गोवारी नृत्य” करित गावभर फिरतात .असा गाय गोधन काल मुंडीपार येथे  सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजाभाई)खान व मान्यवर गावकरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पाडण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी गोवारी समाज संघटनाचे संघटक नामदेव नेवारे, अध्यक्ष प्रल्हाद राऊत,  ज्ञानेश्वर राऊत, उत्तम राऊत, डेकचंद पटले,रामेश्वर शहारे, टेकचंद पटले,जनिराम आंबेडारे, रामेश्वर राऊत,, मारोती नेवारे, मनिराम पटले,भैय्यालाल वाघाडे,रतिराम राऊत,इंद्रराज पटले आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला गोवारी समाजाचे नागरिकांसह परिसरातील महिला-पुरूषांची उपस्थित होती.