धानाला 1000 रू. बोनस व खरेदी केंद्र त्वरीत सूरू करा – माजी आमदार राजेंद्र जैन

0
16

आमगाव- तालुक्यातील ग्राम कातूर्ली येथे नवयुवक समिती भवानी चौक व दुर्गा उत्सव समिती बजरंग चौक च्या वतीने आयोजीत विविध लोककला कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे यांच्या हस्ते संपन्न झाले. या सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी बोलतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांना दिलासा देण्यासाठी वाढती महागाई व जिवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किंमती कमी करून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या विद्यमान सरकार ने मार्गी लावण्यात याव्यात. अतिवृष्टी, खते व किटक नाशकांच्या वाढत्या किंमतीने शेतकरी हवालदील झाला आहे करिता महाराष्ट्र शासनाने धानाला 1000/- रूपये बोनस देण्यात यावा. शासकीय हमी भाव धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. तसेच प्रति एकरी 20 क्विंटल धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यात यावी. परतीच्या पावसामुळे व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतक-यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान ग्रस्तांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात यावे. शेतक-यांना 24 तास विद्युत उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच शेतक-यांच्या कृषी पंपाचे बिल माफ करण्यात यावे यासारख्या समस्या सरकारने मार्गी न लावल्यास खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन जैन यांनी केले.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी सर्वश्री राजेंद्र जैन, नरेश माहेश्वरी, सुरेश हर्षे, अखिलेश सेठ, केतन तुरकर, केसरीचंद बीसेन, सिताराम कोरे, ताराचंद शेंद्रे, भोजराज जैतवार, चुनीलाल सहारे, बुधराम कटरे, प्रेमसिंह परिहार, आर टी शेंद्रे, श्यामसुंदर कटरे, रूपचंद शेंद्रे, डॉ. विजय कोरे, भागवत बिसेन, सौ ज्ञानवंता शिवणकर, सौ रंजना फरकुंडे, सौ शालिनीताई ऊके, रंजय ऊके, प्रकाश कोरे, धनलाल जैतवार, भूमेश्वर फरकुंडे, नीलकंठ कुंभलकर, धनराज सहारे प्रेमलाल मोहनकर, रौनक ठाकुर, सहीत बहुसंख्येने गावातील नागरीक उपस्थित होते.