दादालोरा खिडकीतंर्गत शिलाईमशीन योजनेचा आदिवासी मुलींना लाभ

0
31

चिचगड,दि.01-पोलीस ठाणे अंतर्गत सशस्त्र दूरक्षेत्र बोंडेच्यावतीने दादालोरा खिडकी योजने अंतर्गत शिलाई मशीनचे प्रशिक्षण घेतलेल्या आदिवासी मुलींसाठी शिलाई मशिन मिळावे याकरीता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातंर्गत कागदपत्र सादर करुन सहकार्य करण्यात आले.आदिवासी समाजातील म्हैसुली येथील मुलींना पोलीस विभागाच्या दादालोरा योजनेतंर्गत विविध योजनांची माहितीही देण्यात आली.तसेच बिचटोला येथील 2 मुलींना रहिवासी प्रमाणपत्र मिळवून देण्यात आले.याकरिता सशस्त्र दूरक्षेत्र बोंडे येथील पोलीस उपनिरिक्षक राहुल दुधमल व पोलीस अंमलदार यांनी विशेष सहभाग घेतला. नवनियुक्त गोंदिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सशस्त्र दुरक्षेत्र, बोंडे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे केलेल्या कार्याबद्दल कौतुक केले आहे.