गोंदिया जिल्ह्यात चोरी व अपघाताच्या घटना

0
29

पोस्टे गोंदिया शहर:. मोटर सायकल चोरी

प्रकरण अशा प्रकारे आहे की, दि. 27/10/2022 चे 10/00 वा. ते 14/30 वा. दरम्यान यातील फिर्यादी कमलेश मुकेश तुरकर, वय 31 वर्षे, रा.दासगाव, ता.जि. गोंदिया यानेे आपली हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स काळे निळे पट्टे असलेली मोटार सायकल क्र.एम.एच.35/ए.बी.4823 असलेली किमंती 30,000/- रुपये श्री.जी. कॉम्पलेक्स गोंदिया येथे मोटार सायकल पार्किंग मध्ये ठेवली असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन पोस्टे गोंदिया शहर येथे अप क्र. 697/2022 कलम 379 भा.द.वी. अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोना. प्रमोद चौव्हान/448, पोस्टे. गोंदिया शहर, हे करीत आहेत.

पोस्टे तिरोडा:. जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने
प्रकरण अशा प्रकारे आहे की, दि. 31/10/2022 चेे 11/00 वा. ते 11/30 वा. दरम्यान यातील फिर्यादी नामे मार्कड अर्जुन राऊत, वय 43 वर्श, रा. मुंडीकोटा याने आपले वडील नामे अर्जुन राऊत यांना बोलले की, दोन्ही बकÚया आरोपीकडे घेवुन जा नाहीतर आरोपी हा बकÚया विकुन टाकील असे बोलल्याचे कारणावरून फिर्यादी हा झोपला असतांना यातील आरोपीने फिर्यादीच्या मानेवर, खांदयावर कुÚहाडीने मारून जखमी करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवाल वरून पोस्टे तिरोडा येथे अप क्र. 1114/2022 कलम 307 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि. जोगदंड, पोस्टे. तिरोडा, हे करीत आहेत.

पोस्टे रावणवाडी:. वाहन अपघात

प्रकरण अशा प्रकारे आहे की, यातील आरोपी चालक याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने लापरवाहीने निष्काळजीपणे चालवुन मोटार सायकल क्र. एम.पी.50/बी.7069 च्या चालकास विरूध्द दिशेने येवुन धडक मारून गंभीर जखमी केले व मोटर सायकलच्या मागे बसलेले यांना किरकोळ जखमी केले. जखमी जाहीद वाहीद खान हा गंभीर जखमी झाल्याने ते दि. 23/09/2022 ते दि. 07/10/2022 पर्यंत दवाखान्यात भरती असल्याने व त्याचे देखरेख करीता कोणीही नसल्याने फिर्यादी जखमी नवाब वाहीद खान, वय 54 वर्ष, रा.ढोरीया परसवाडा, ता. किरणापुर, जि. बालाघाट (म.प्र.), यांचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे रावणवाडी येथे अप क्र. 371/2022 कलम 279,337,338 भादवी. सहकलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोना/1425 पटले पोस्टे. रावणवाडी, हे करीत आहेत.

पोस्टे गोंदिया शहर:. अकस्मात मृत्यु
प्रकरण अशा प्रकारे आहे की, यातील मृतक राजेश गोंडु कोल्हे, वय 40 वर्षे, रा. रापेवाडा, पो. दवनिवाडा, ता.जि. गोंदिया यास दिनांक 30/10/2022 चे 8/00 वा. केटीएस दवाखाना गोंदिया येथे भर्ती केले असता उपचार दरम्यान दि. 31/10/2022 चे 9/00 वा. मृत्यु पावल्याने वैद्यकिय अधिकारी यांचे मेमो रिपोर्ट व डेथ सर्टिफीकेट वरुन पोस्टे गोंदिया शहर येथे अकस्मात मृत्यु क्र. 51/2022 कलम 174 जा.फौ. अन्वये मर्ग नोंद करण्यात आला असुन सदर मर्गची चौकशी पोना/1775 सुनिल भांडारकर, पोस्टे. गांेदिया शहर, हे करीत आहेत.

पोस्टे आमगाव: . अकस्मात मृत्यु

प्रकरण अशा प्रकारे आहे की, दि. 31/10/2022 चे 13/30 वा. दरम्यान यातील फिर्यादीचा भाऊ मृतक नामे मदन बकाराम गायधने, वय 47 वर्ष, रा. जवरी हा आपले राहते घरी कोणतेतरी विषारी औषधी प्राशन करून घरी तडफडत्या अवस्थेत दिसल्याने उपचार कामी ग्रा.रू. आमगाव येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन मृत घोषीत केले. असे फिर्यादी अमृत बकाराम गायधने, वय 45 वर्ष, रा. जवरी, ता. आमगाव यांचे तोंडी रिपोर्ट तसेच डॉक्टरी लेखी मेमो वरून पोस्टे आमगाव येथे अप क्र. 51/2022 कलम 174 जा.फौ. अन्वये मर्ग नोंद करण्यात आला असुन सदर मर्गची चौकशी पोहवा/659 शेंद्रे, पोस्टे. आमगाव, हे करीत आहेत.