मावा तुड़तुड़ा व खोडकिडामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-याना मदत करा- जनतेची पार्टीची मागणी

0
21

गोंदिया,दि.01ः- जिल्ह्यात मावा तुडतुड़ा, व खोडकीड़ामुळे अनेक शेतक-यांच्या शेतपिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले आहे.गोंदिया जिल्हा हा शेतक-यांनी व्याप्त असून या जिल्ह्यातील लोकांचे मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यांचे जीवन शेतीवर अवलंबून असल्याने त्यांना उदर निर्वाह करीता फारच अडचणीचा सामना करावे लागणार.याकरीता मदतीसाठी त्यांना नुकसान झालेल्या शेतपिकाचे त्वरित चौकशी करून पंचनामे करणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी शेतक-यांच्या हिताचा विचार करता त्वरित चौकशी करुन पंचनामे करण्यात यांवे अशी मागणी जनतेची पार्टीचे अध्यक्ष भाऊराव उके यांच्या नेतृत्वखाली उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्याकड़े निवेदनातून करण्यात आली आहे.
या दरम्यान जनतेची पार्टीचे अध्यक्ष भाऊराव उके, किसान आघाडी चे जिल्हाध्यक्ष, मोहन गौतम, सभापती मुनेश रहांगडाले, ज्ञानचंद जमईवार, काटी जिप प्रमुख, अनंदा वाढीवा,काटी जिप सदस्य, वैशाली पंधरे जिप सदस्य पांजरा, शेखर वाढवे, कनीराम तावाड़े, प.स.समिती सदस्य खमारी, सुंदर अग्रवाल, राजू कटरे, सोनू पंधरे, मनीष वैष्णव इत्यादी या दरम्यान उपस्थित होते.