जबरनजोतधारकांचे गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

0
29

गोंदिया,दि.04ः- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 25 गावातील वनजमिनीवरील अतिक्रमणधारक जबरानजोतधारकांनी आपल्या न्याय हक्काला घेऊन 3 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले.

ही निदर्शने विलास भोंगाडे, दीनानाथ वाघमारे, मनिषा शहारे, अल्का मडावी, गणिका खोबा, करुणा करहाडे यांच्या नेतृत्वात समाज परिवर्तन संघटना, अर्जुनी-मोरगांवच्या वतीने करण्यात आली. अनु.जमातीं व इतर पारम्परिक वन निवासी कायदा 2006 अंतर्गत आदिवासी व गैर आदिवासी वन निवासीचे अधिकार जल, जंगल, जमीनीवर मान्य करते. तरी या कायदयाची पूरेपुर अंमलबजावणी प्रशासनाच्यावतीने झालेली नाही.ग्रामसभा,वन हक्क समिति,उपविभागीय समिति व जिल्हाधिकारी कार्यालयाने जबरनजोतधारकांनी केलेल्या दाव्याचा आढावा घेवून प्रकरणे निकाली काढावी या मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात आले.आंदोलकाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नयना गुंडे यांना भेटून जबरनजोतधारकांचा दावा मंजूर झाल्यास त्यांना सात बारा देण्यात यावा.मंजूर न झाल्यास फेरचौकशी करुन दावा मंजूर करावा. वन हक्क अधिकार 2006 च्या कलम 13(1) नुसार गैरआदिवासी दावेदारासाठी 3 पिढ़यापासून राहत असल्याचा पुरावा म्हणून जेष्ठ नागरिकांचा जबाब हा ग्राह्य धरण्यात यावा, अश्या विविध मागण्या करण्यात आल्या.अर्जुनी तालुक्यातील जुनेवानी, केळवद, बोळदा, कवठा, नवेगांव, भरनोली, वारवी, नवेगांवबांध, नवनितपुर, कन्हाळगांव, अरततोंडी, परसटोला, करड़बोळदा, सुरबन, धमदीटोला, वडेगांव, तिरखुरी, सावरटोला, बोरटोला, केसोरी, कनेरी, गार्डनपुर इत्यादि गांवतील अतिक्रमणधारक शेतकरी सहभागी होते. निदर्शने यात सहभागी मनीषा शहारे, अल्का मडावी, करूणा करहाडे, अनिता वाघमारे, परेश दुरुगवार, भाऊराव नंदेश्वर, अक्षय कलांजे, दिलीप समरित, लक्ष्मीबाई डायरे, सुखलाल बंजार, देवरॉव वलक़े इत्यादि सहभागी होते.