Home विदर्भ विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश

विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्यात यश

0

ब्रम्हपुरी- तालुक्यातील सिंदेवाही – मेंडकी मार्गावरील किटाळी (बोद्रा) गावातील एका विहिरित बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी, ४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून जीवनदान देण्यात आले. शिकारीसाठी पाठलाग करताना बिबट विहिरीत पडल्याचे सांगण्यात येत आहे.सविस्तर वृत्त असे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील चारही बाजूने घनदाट अरण्याने व्याप्त असलेल्या किटाळी (बोद्रा) गावातील संतोष मेश्राम यांच्या घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. विहिरीमध्ये बिबट्याच्या डरकाळीचा आवाज परिसरातील लोकांना ऐकू आला. कशाचा आवाज आहे म्हणून विहिरीजवळ जाऊन बघितले तर विहिरीत बिबट्या पडलेला होता. ही माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली. वनविभागाला माहिती होताच त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. तब्बल दोन ते तीन तासानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.

Exit mobile version