मतदारांनी आपल्‍या नावाची खात्री करून घ्‍यावी- जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
63

गोंदिया दि. 08भारत निवडणूक आयोगाने राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2023  या अर्हता दिनांकावर आधारीत प्रारूप मतदार यादी बुधवार 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्‍द  करण्‍यात येणार आहे. या प्रारूप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रावर, मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्‍द करण्‍यात येतील मतदारांनी आपल्या नावाची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

 मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे नाहीत अशा मतदारांना नमुना – 6 मध्‍ये अर्ज सादर करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट करता येतील. तसेच मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमूना -7  मध्‍ये अर्ज सादर करता येतील. मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमूना – 8  मध्‍ये अर्ज सादर करता येतील. हे अर्ज 9 नोव्‍हेंबर 2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार  यांच्या कार्यालयात तसेच मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्‍याकडेही स्वीकारण्यात येतील. ग्राम विकास व पंचायत राज विभागाच्‍या सहकार्याने 10 नोव्‍हेबर रोजी राज्यभर विशेष ग्राम संभेची आयोजन करण्‍यात येणार आहे. या दिवशी ग्रामसभांमध्‍ये मतदार यादीचे वाचन केले जाईल.

          मतदारांच्या सुलभतेसाठी www.nvsp.in  या संकेतस्थावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in  या संकेतस्थळास भेट द्यावी.  9 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील  सर्व मतदान केंदावर संबंधित बीएलओ प्रारूप मतदार यादीसह उपस्थित राहणार आहेत. मतदारांनी  प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्‍ता, लिंग, जन्‍मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदार संघ इ. तपशिल मतदार यादीत तपासुन ते अचूक आहेत याची खात्री करावी.  मतदार यादीत नांव नोंदणी / दुरूस्‍ती / वगळणी करण्‍यासाठी नागरीकांनी www.nvsp.in  संकेतस्‍थळाचा वापर करुन ऑनलाईन अर्ज सादर करावेत अथवा ऑफलाईन अर्ज सादर करण्‍यासाठी संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ), तहसिल कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्‍हाधिकारी  तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

 मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी बुधवार 9 नोव्हेंबर, 2022 प्रसिध्द करणे,  दावे व हरकती  स्विकारण्याचा कालावधी बुधवार 9 नोव्हेंबर ते गुरुवार 8 डिसेंबर 2022, विशेष मोहिमांचा कालावधी दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत, मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार, दावे व हरकती निकालात काढणे यासाठी सोमवार 26 डिसेंबर 2022, अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी मागणे व डाटाबेस अद्यावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई  मंगळवार 3 जानेवारी  2023, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे गुरुवार 5 जानेवारी 2023 याप्रमाणे राहील, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.