पंचायत समिती सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

0
29

 विभाग प्रमुखच मारतात सभेला दांडी : कर्मचारी, पदाधिकाऱ्यांतील वाद चव्हाट्यावर

अर्जुनी मोरगाव,.पं.स. मार्फत 71 ग्रामपंचायत अंतर्गत शेकडो गावांत विकासाची गंगा पोहोचवली जाते.लोकांपर्यंत विकास पोहचावा, जनतेची कामे व्हावी, वैयक्तिक व सार्वजनिक हिताची कामे व तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सभापती, उपसभापती सह 14 पदाधिकारी आहेत. विविध योजना, जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी दरमहिण्याला मासीक सभेचे आयोजन केले जाते. मात्र अशा महत्वाच्या मासीक सभेला पंचायत समितीमधील अधिनिस्त विविध विभागाचे विभागप्रमुखच गैरहजर असतात, तर सभा घ्यायची कशीया कारणावरून आज  शुक्रवारी आयोजित सभेला सभापती, उपसभापतींसह सर्व सदस्यांनी बहिष्कार टाकला. यावरून अधिकारी,पधाधिकारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला.

      शुक्रवारी पंचायत समितीची मासिक सभा उमेद सभागृहात आयोजित करण्यात आली होती. पदाधिकारी नवनिर्वाचित असून ही सातवी सभा होती. अल्पावधीतच सभेवर पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घालणे म्हणजे पदाधिकारी, अधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसतो.  मासिक सभेची माहीती जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी यांना माहिती दिली जाते. मासीक सभेला सर्व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित असणे क्रमप्राप्त आहे. सभेत मागील सभेचे कार्यावृत्त वाचून कायम करणे,पदाधिकारी यांचे प्रश्नांना उत्तरे देवून समाधान करणे, शासनाच्या नवनवीन योजना व परिपत्रकाचे वाचन करणे असे अनेक प्रकारचे विषय सभेत चर्चेला येतात. मात्र सभेला अनेक विभाग प्रमुख दांडी मारतात. प्रतिनिधी पाठवत नाही. विभागप्रमुखांना आपल्या विभागाचा आढावा सादर करावा लागतो. विभाग प्रमुख किंवा प्रतिनिधी उपस्थित नसतील तर सभा कशासाठी? जाब विचारायचा कुणाला? यावरून सर्व सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि सभात्याग केला. अनेकदा काही विभाग प्रमुख सभागृहात चर्चा झाल्याबरोबर निघून जातात, असा आरोप सदस्यांनी केला.  मासीक सभेवर बहिष्कार आणि सभात्याग ही तालुक्यातील पहिली घटना असावी. पंचायत समिती सदस्यांचा सभात्याग हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.  विभाग प्रमुख आणि प्रतिनिधी संबधाने मासीक सभेत गटविकास अधिकारी यांना जाब विचारल्यास दरवेळी गटविकास अधिकारी स्मित हास्य करुन वेळ मारुन नेतात असाही आरोप सदस्यांनी केला.या प्रकरणावरून पंचायत समितीचे अधिकारी मस्तवाल आणि सैराट झाल्याच्या चर्चा आहेत.  माजी सभापतीच्या काळात कुठल्याही विभागाचा कर्मचारी सभापतीच्या परवानगी शिवाय कार्यालय सोडत नव्हते.हा इतिहास आहे.

सहाय्यक खंड विकास अधिकारी यांना सभागृहात यायला उशीर झाला. काही विभाग प्रमुख हजर होते काही उशिरा आले. पंचायत समिती सदस्यांना कामानिमित्त बाहेर  जायचे होते. या कारणास्तव सर्व सदस्यांनी सभात्याग केला.

विलास निमजे, प्रभारी गटविकास अधिकारी