नविन रस्तासाठी बँक काॅलनीतील जुन्या रस्ताची लावली वाट

0
33

आमगांव – शहरातील रिसामा परिसरात बँक काॅलनी नावानी ओळख असलेली पहिली वसाहत (काँलोनी) म्हणून ओळखली जाते. सृष्टीच्या नियमानुसार लोकसंख्या जसजसी वाढते त्याचप्रमाणे निवासाची आवश्यकता असते. दि 11/12/22 शुक़वारला काॅलनीतील साखरे ले-आऊट मध्ये सावँजनिक बांधकाम विभागाद्वारे बनत असलेल्या नविन रोडसाठी मटरियल घेऊन आलेल्या टिपपरने पाच वर्षांपूर्वी बनलेल्या सिमेंट रोड व नाली तोडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.यावरुन पाच वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले रस्ते व नाली किती निकृष्ठ दर्जाचे आहेत याचा अंदाज लावला जाऊ शकतो. शासनाचा पैशाची उधळपटटी अभियंते व अधिकारी कशाप्रकारे करतात अशा प्रश्न उपस्थित करुन नागरिकांनी असंतोष व्यक्त केला आहे.  काँलोनीतील व गायत्री मंदिर जवळील नालीचे पाणी जनार्दन ब्राम्हणकर यांच्या शेतीत जात असल्याने शेतीतील धान व अन्य पिकाचेही नुकसान होत आहे. ब्राम्हणकर यांनी नगरपरिषदेकडे व तहसिलदाराकडे तक्रार करुनही काहीच कारवाई होत नसल्याने प्रशासन ढिम्म झाल्यासारखेच आहेत.त्यामुळे पुन्हा काॅलनीवासियांनी तुटलेली नाली व रस्ता त्वरीत दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.