मुंडीपार येथे जननायक क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

0
32

गोरेगांव:-आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती आज मंगळवारला ग्राम पंचायत कार्यालय मुंडीपार येथे साजरी करण्यात आली.जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड राज्यातील उलिहातु येथे झाला.आदिवासी समाजामध्ये मोठी क्रांती घडविण्यासाठी बिरसा मुंडा यांचे नाव घेतले जाते. आदिवासी समाजाच्या उलगुलान आंदोलनाचे ते जनक होते.
बिरसा मुंडा यांना ‘धरती बाबा’ म्हणूनच ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी समाजात केलेली जनजागृती आणि व्यापक मानवसेवेमुळे आजही असेच ‘धरती बाबा’ मिळावेत, अशी प्रार्थना संपूर्ण देशात केली जाते .म्हणुन आदिवासी भागांमध्ये क्रांतिकारी बिरसा मुंडा ईश्वरासमान पूजले जातात.
लोकनायक बिरसा मुंडा यांच्या जयंती निम्मिताने ग्राम पंचायत कार्यालयात विस्तार अधिकारी तसेच प्रशाशक अधिकारी  टि.डी.बिसेन यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले.तसेच बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती दिली. यावेळी सचिव अरविंद साखरे,मुख्याध्यापक एस.एम.काठेवार, ब्रिजकमल शहारे,देवदास चौधरी,ग्रामरोजगारसेवक उमेंद्र ठाकुर,संघनक परिचालक रोहित पांडे, लिपीक सुनिल वाघाडे,परिचर अजय नेवारे,रवि गमधरे सुरेंद्र पटले,शामराव बंसोड,राजेश कटरे,संदिप सरजारे आदी उपस्थित होते.