भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रातींचा आदर्श आत्मसात करा:- जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर

0
15

अर्जुनी मोरगाव,दि.16ः-  जल,जंगल,जमीन आणी आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी बिरसा मुंडांनी बिहार राज्यातुन आदिम क्रांतीची मशाल पेटवली.अशा महामानवाचे विचार व आदर्श सर्वांनी आत्मसात करावे असे विचार जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणवीर यांनी व्यक्त केले.ते क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त मौजा पवनी/धाबे,रांजीटोला,कोहलगाव,गोठणगाव व गंधारी येथील आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
आजची परिस्थिती वेगळी प्रत्येक व्यक्तीला वाटते की,आजच्या या युगात बिरसा मुंडा जन्माला आला पाहिजे. पण तो माझ्या घरी नाही तर शेजारच्या घरात जन्माला आला पाहिजे.हिच विचारसरणी आपल्याला बदलायची आहे आणि आपली विचारसरणी बदलली तर नक्कीच एक क्रांती घडुन येईल.देशाला स्वांतत्र्य मिळून ७५ वर्षे झाली पण आदिवासी बांधव अजूनही वंचित आहे.म्हणुन माझ्या आदिवासी बांधवांनो सर्वप्रथम आपणास स्वतः बदलावे लागेल.अवघे अल्प आयुष्याच्या कारकिर्दीत बिरसा मुंडांनी केलेली क्रांती ही इतिहासाची साक्ष आहे.परंतु शोकांतिका आहे की,आपला कुणी इतिहास लिहिला नाही म्हणुन आपला इतिहास जाणून आपणच आपला इतिहास घडवावा असे प्रतिपादन केले.