
गोंदिया,दि.22-जिल्ह्यातील पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा ककोडी येथे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस दलाचे आधुनिकीकरण अंतर्गत कम्युनिटी पोलिसिंग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नुकतचे करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये चांगले नितिमूल्ये रुजवून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे तसेच कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून जनमानसात पोलीस विभागाप्रती सहानभूती निर्माण करण्यावर माहिती देण्यात आली.या कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन,बाल लैगिक अत्याचार,ऑनलाईन फसवणूक,भ्रष्टाचार निर्मुलनवर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच गुन्ह्यास प्रतिबंध, पोलीस स्टेशनचे कामकाज,सायबर क्राईमबाबत माहिती,महिला व बालकांची सुरक्षितता,रस्ते अपघात व नियम जागरूकता, नक्षल विरोधी जागरूकता,हत्यार व दारुगोळा बाबत माहिती आणि कम्युनिटी पोलिसिंग बाबत व्यापक चळवळ राबवण्याबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. हे आयोजन अप्पर पोलिस अधीक्षक कॅम्प देवरीचे अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली चिचगडचे ठाणेदार शरद पाटील यांच्यावतीने करण्यात आले होते.





