‘माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी’ उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी यांची बोरकन्हार गावाला दिली भेट

0
21

गोंदिया, दि. 25 : शेतक-यांना येणा-या अडचणी प्रश्न प्रशासनाने समजुन त्यावर उपाययोजना करुन निर्णय घ्यावेत यासाठी संपुर्ण जिल्हयात ‘माझा एक दिवस माझ्या बळीराज्यासाठी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत राज्य शासनातील अधिकारी यांनी शेतक-यांच्या घरी भेटी घेऊन त्यांना दैनंदिन जिवनात येणा-या समस्या, शेतीविषयक अडचणी इत्यादी विषयी जाणुन घेणे अभिप्रेत आहे.

           याच उपक्रमाचा भाग म्हणुन जिल्हाधिकारी गोंदिया, नयना गुंडे यांनी 22 नोव्हेंबर 2022 रोजी आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी गावातील शेतक-यांशी संवाद साधत त्यांना येणा-या अडचणी जसे शेतीला पतपुरवठा, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा शासकिय योजनांचा लाभ घेण्यात      येणा-या अडचणी इ. जाणुन घेतल्या त्यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण व वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषि विज्ञान केंद्र, हिवरा येथिल डॉ. सय्यद अली उपस्थित होते. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  हिंदुराव चव्हाण यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणा-या विविध योजनेबाबत शेतक-यांना माहिती दिली. डॉ. सय्यद अली यांनी शेतक-यांना शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शन केले.

            या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी यांनी आमगाव तालुक्यांतील पदमपुर येथेही भेट दिली व कृषि विभागाच्या प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेंतर्गत महिला शेतकरी ममता ब्राम्हणकर यांनी उभारलेल्या दुग्ध प्रक्रिया उद्योगाची पाहणी केली व कृषि विभागामार्फत बांधलेल्या वनराई बंधा-याची पाहणी केली त्यावेळी गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठयाप्रमाणावर उपस्थित होते.