ओबीसींना 52%आरक्षण द्या,ओबीसी जातनिहाय जनगणना करा – राष्ट्रीय पिछड़ा(ओबीसी) वर्ग मोर्चा

0
24

सिंदखेडराजा,दि.30 नोव्हें.-मातृतिर्थ सिंदखेडराजात राष्ट्रीय पिछड़ा(ओबीसी) वर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्या नेतृत्वात भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. सिंदखेडराजातील सर्व पक्षीय नेतृत्वांनी पुढाकार घेवून कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले असता व्यापारी प्रतिष्ठांनानी उत्स्फूर्त बंद पाळून सहकार्य केले.भारत बंद हा ओबीसींना संख्येऐवढे 52 % प्रतिनिधित्व देण्यात यावे,ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला गॅरंटी हमीभाव(MSP)देण्यात यावी,खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्यात यावे,मजूरांविरोधातील शोषणकारी कायदे रद्द करावे,ईव्हीएममुळे निवडणूकीत होणारे घोळ थांबविणे,NRC-CAA-NPR च्या विरोधासाठी,कर्मचारी जुनी पेन्शन सुरू करण्यात यावी,आरक्षण बॅकलॉग व नवे आरक्षण लागू करण्यासाठी अधिनियमन कायदा करण्यात यावा,ओबीसी-एस सी-एस टी विद्यार्थ्यांना स्काॅलरशिप पुर्ववत लागू करावी,छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांची बदनामी करणारांवर कडक कारवाई करावी व ईतर मागण्यांसाठी करण्यात आला आहे असे पदाधिकाऱ्यांनी  सांगितले.
प्रसंगी आयोजक ओबीसीनेते सावता परिषद जिल्हाध्यक्ष श्यामभाऊ मेहेत्रे,ओबीसीनेते छगनराव मेहेत्रे,नगराध्यक्ष सतिशभाऊ तायडे,समता परिषद तालुकाध्यक्ष ॲड संदिप मेहेत्रे,नगरसेवक गणेश झोरे,नगरसेवक योगेश म्हस्के,नगरसेवक नरूभाऊ तायडे, नगरसेवक कैलास मेहेत्रे,नगरसेवक राजेंद्र आढाव,युवानेते अनिल मेहेत्रे,दिपक ठाकरे,बाळूसेठ शेवाळे,शहाजी चौधरी,आरेफ चौधरी,शमशेर पठाण,गणेश खरात,बबन जाधव,संजय मेहेत्रे,मा.घनश्याम केळकर,प्रल्हाद मेहेत्रे,प्रशांत जायभाये,नंदकिशोर चौधरी,राजे लखुजीराव जाधव अभ्यासक पत्रकार छगनराव झोरे, गजानन मेहेत्रे,नंदुभाऊ वाघमारे,रवि ढवळे,राजेश वायकोस,अनिल वायकोस,गोविंद सोनुने,विशाल चौधरी,माधव मेहेत्रे,लक्ष्मण ठाकरे,तालुकाध्यक्ष रा पि वर्ग मोर्चा ठकाजी तिडके,गणेश आढाव,वैद्य,विष्णू मगर,अखिल भारतीय माळी महासंघ शिक्षक आघाडी प्रदेशाध्यक्ष नंदकिशोर खरात,मंजाजी मेहेत्रे,काशिनाथ मेहेत्रे,सोनाजी मेहेत्रे,गंगाधर मेहेत्रे,दिलीप आढाव,मा.डॉ. विलास खुरपे,मा.डॉ.प्रशांत खरात,मा.डॉ.यशवंत झोरे,मा.अमोल भाट,मा.विजय र तायडे,मा.संदिप माने,योगेश तिडके,केशव ठाकरे,बाबु आढाव,बामसेफ तालुकाध्यक्ष डॉ.भिमराव म्हस्के,राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा जिल्हा संयोजक मौर्य आकाश मेहेत्रे,वनश्री जनाबापू मेहेत्रे,रामेश्वर मेहेत्रे,चंद्रकांत बनसोड,तेजराव म्हस्के,कैलास गवई,पवन आढाव,गंगाधर कुंडकर,शुभम चौधरी,रामेश्वर जाधव,किरण सातपुते,किरण आढाव,गणेश आढाव,मा.अविनाश केळकर,संदिप ढवळे,अनंता कुरंगळ,संतोष झोरे,विशाल ठाकरे,दिनेश हिरे,गजानन घोलप,किशोर जाधव,मंगेश खुरपे,संदीप मेहेत्रे ,शैलेश चौधरी,राहुल जाधव,विजय चौधरी,ज्ञानेश्वर खंदारे,अनिल खुरपे,लक्ष्मण आढाव,विशाल चौधरी,सौरभ कोरडे,अजय चौधरी,राजु चांगाडे,गजानन ठाकरे,संजय पेटकर,नंदु खरात,गणेश भोजणे व बहुसंख्य शेतकरी,ओबीसी, सुशिक्षित बेरोजगार युवक भारत बंदच्या आंदोलनात सहभागी झाले होते.