सालेकसात आढळले नक्षल बॅनर

0
75

गोंदिया –सालेकसा  तालुका मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोर्रे व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील डोमाटोला या दोन गावांत नक्षली बॅनर आढळल्याची घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
सालेकसा तालुका आदिवासीहुल, नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील दरेकसा भागात मागील अनेक वर्षांपासून नक्षल्यांच्या हालचाली कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र, अधूनमधून काही प्रमाणात नक्षल्यांच्या हालचाली होत असतात. त्यातच 28 नोव्हेंबर राजी तालुक्यातील दोन गावांत नक्षली बॅनर आढळल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. तालुका  मुख्यालयापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोर्रे व छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या डोमाटोला या गावात नक्षल्यांनी बॅनर लावले होते. घटनेची माहिती सालेकसा पोलिस ठाण्याला मिळताच पोलीस निरीक्षक जनार्दन हेगडकर व त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठले. दरम्यान नक्षल्यांनी लावलेले दोन्ही गावांतील बॅनर काढले. या बॅनरवर भारत की ‘कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद, जनमुक्ती छापामार सेना जिंदाबाद’ असे लिहिले होते. हे बॅनर दरेकसा नक्षल एरिया कमिटीने लावल्याचा त्यात उल्लेख आहे.