मृत व्यक्तीच्या स्वाक्षरीत बदल करुन जि.प.बांधकाम विभागातून काढले बिल

0
150

ICICI बँकेतून मृत व्यक्तीच्या खात्यातून वर्षभरानंतर निघाले 70 लाख?

गोंदिया– गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत सुमारे ८ लाख रुपये किमतीचे ९ काम बग्गा यांच्या फर्मला मिळाले होते. त्यामध्ये भरनोली,उपकेंद्र खोबा,मेंढा,उपकेंद्र खेडेपार,डोंगरगाव डेपो,धापेवाडा,झाशीनगर,करटी बु. येथील कामाकारीता निविदा मंजुर झालेली होती.यातच भरनोली येथील ७ लाख १५ हजार रुपयाच्या कामाची निविदा पी.ए.बग्गा कॉन्ट्रक्टर एण्ड सप्लायर यांनी सादर केली होती.ती निविदा 0.११ टक्के कमी दराने सादर केल्याने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांनी ४ मार्च २०२२ रोजी अति.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात तडजोड करण्यासाठी बोलावले होते.विशेष म्हणजे या फर्मचे संचालक प्रितपालसिंंग अमोलकसिंग बग्गा यांचा मृत्यू १९ फेबुवारी २०२१ रोजी झाल्याने त्याची नोंद ३ मार्च २०२१ रोजी नगरपरिषद गोंदिया येथे करण्यात आली असून त्यासंदर्भातील मृत्यू प्रमाणपत्र १७ आँगस्ट २०२२ रोजी जारी करण्यात आले आहे.जर सदर व्यक्ती मार्च २०२१ मध्ये मृत्यू झाला असेल तर मार्च २२ मध्ये त्यांच्या नावावर हजर राहिलेली व्यक्ती कोण हा प्रश्न उपस्थित झाला असून शासनाची फसवणूक करीत स्वाक्षरीमध्ये हेरफेर करण्यात आल्याचे दिसून येत आहे.बग्गा यांनी जि.प.बांधकाम विभागाकडे सादर केलेल्या नोंदणीपत्रातील स्वाक्षरी आणि तडजोडीकरीता मिळालेल्या दोन पत्रामधील स्वाक्षरीत स्पष्ट फरक दिसून येते.
सोबतच सबंधित शासकीय विभागाला फर्मचे संचालक मृत्यू झाल्याचे का कळविण्यात आले नाही आणि तडजोडीकरीता उपस्थित राहण्याकरीता कोण हजर राहिले.पी.ए.बग्गा यांच्या पंजीयन करारनाम्यातील स्वाक्षरी व तडजोड पत्रातील स्वाक्षरीमध्ये तफावत दिसून येत आहे.त्यातच जीएसटी रद्द झालेली असताना १२ टक्के जीएसटीची रक्कम बांधकाम विभागाची रक्कम कशी वसुल करण्यात आली असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.
पी.ए.बग्गा यांनी जि.प.बांधकाम विभागाकडे केलेल्या पंजीयन आदेशातील स्वाक्षरीमध्येही फरक दिसून येत आहे.तर यांचे जीएसटी नंबर सुध्दा १९ फेबुवारी २०२१ला चा रद्द झाल्याचे समोर आले आहे.

त्यानंतरही त्या व्यक्तीच्या मृत्यूची माहिती अधिकृतरित्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग व ICICI बँकेला न देता काम पूर्ण करण्यात आले.आणि त्या कामापोटी मिळालेले सुमारे 70 लाख रुपये हे मृत व्यक्तीच्या खात्यात जमा करण्यात आले.मात्र सदर ICICI बँकेनेही सदर व्यक्तीचा मृत्यू 2021 मध्येच झालेला असताना 2022 मध्ये कुठल्या निर्णयाद्वारे रक्कम विड्राल करण्यास परवानगी दिली.हा प्रश्न उपस्थित झाला आहे.विशेष म्हणजे एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांनी कितीही धनादेशावर स्वाक्षरी आधीच करुन ठेवले असले तरी ते मृत्यूनंतर ग्राह्य धरले जात नसल्याचे नियम असताना हा प्रकार घडलाच कसा यासंदर्भात सदर आयसीआयसी बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता कठल्याही खातेदाराची माहिती देता येत नाही मात्र आपण प्रत्यक्ष या माहिती देऊ असे बेरार टाईम्सला सांगण्यात आले.