आगामी ग्रामपंचायत निवडणूकीचे मानधन कर्तव्यस्थळीच द्या -शिक्षकांची मागणी

0
17

अर्जुनी मोरगाव,दि.04ः- ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2007, 2012, 2017 चे निवडणूक कर्तव्य पार पाडणाऱ्या शिक्षकांचे प्रलंबित मानधन मिळावे. व आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मानधन कर्तव्यस्थळी देण्याची मागणी कैलास हांडगे व इतर शिक्षकांनी निवेदनाद्वारे स्थानिक प्रशासनास केली आहे.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात निवडणूक मानधन संदर्भाने वेळोवेळी शिक्षकांवर अन्याय झाला आहे, या अन्यायाची पुनरावृत्ती यापुढे होऊ नये व आगामी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे मानधन कर्तव्यस्थळी देण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार अर्जुनी मोरगाव तथा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 यांच्याकडे करण्यात आली,ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २००७, २०१२,२०१७ व जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२ च्या दुसऱ्या टप्प्याचे मानधन अजूनपर्यंत प्रलंबित आहे. याची पुनरावृत्ती आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये होत असेल तर आम्हाला या कामातून वगळण्यात यावे व याकरीता इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घ्यावे असे निवेदनाद्वारे कळविण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने सर्वश्री राजेश साखरे, कैलास हांडगे, राजेश मरघडे, गजानन रामटेके, जगदीश मेश्राम, पुंडलिक वकेकर, भागवत सोनवणे, हेमराज समरीत, सुरेश ब्राह्मणकर व इतरही शिक्षक हजर होते.