10 वर्षापासून फरार महिला आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

0
46

गोंदिया,दि.04ः- गेल्या 10 वर्षापासून एका प्रकरणात फरार असलेल्या महिला आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील किरणापूर परिसरातून अटक केली आहे. सविस्तर असे की, केस क्रं. ५४१ / २०१२ कलम ४९४,३४ भादंवि मधील खापर्डे कॉलनी गोंदिया येथील महिला ही 2012 पासुन फरार असल्याने महिलेस अटक करून न्यायालय समक्ष हजर करण्यासंबंधाने गोंदिया न्यायालयाने पकड वॉरंट काढले होते.त्या अनुषगांने पोलीस अधीक्षक  निखिल पिंगळे यांच्या आदेशावर पोलीस उप निरीक्षक सायकर यांना फरार महिलेचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्या अनुषंगाने महिला अधिकारी पोउपनि सायकर तसेच महिला व पुरुष पोलीस स्टॉपने सदर महिलेचे शोध सुरू केला असता 1 डिसेबंर 2022 रोजी सदर महिलेच्या पतीकडून तसेच आजुबाजुचे लोकांकडुन, तसेच गोपनिय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर महिला आरोपी ही बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर तालुक्यातील मौजा कांद्री खुर्द  येथे वास्तव्यास राहत असल्याची माहिती प्राप्त झाली.त्या आधारावर पोलिसांनी कांद्री खुर्द ता. किरणापुर जि. बालाघाट (म.प्र.) येथे जावून तिच्या नातेवाईकांच्या समक्ष ताब्यात घेतले. महिलेचे आधारकार्ड पडताळणी करुन अटक वारंट मधील महिला हिच असल्याचे खात्री करण्यात आली. सदर वारंट मधील सदर महिलेस पुढील कायदेशीर कारवाई करीता रामनगर पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले.सदरची कारवाई वरिष्ठांचे निर्देशान्वये पो. नि. स्थागुशा श्री आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली महिला अधिकारी पोउपनि सायकर मॅडम व महिला अंमलदार पडोळे, पो.हवा.रियाज शेख, पो.शि.रहांगडाले, यांनी सदरची कारवाई केलेली आहे.