जिल्ह्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांचा सत्कार,संघटनेची जिल्हा कार्यकारीणी गठित

0
21

गोरेगाव,दि.04ः- येथील गुरुकृपा लाॅन येथे आयोजित कार्यक्रमात 3 डिसेबंर शनिवारला जागतिक दिव्यांग दिनाच्या पर्वावर महाराष्ट्र प्रदेश केंंद्रप्रमुख संघ शाखा गोंदियाच्या वतीने जिल्ह्यातील सेवानिवृत्त केंद्रप्रमुखांचा सत्कार सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी गटशिक्षणाधिकारी एन.जे.सिरसाटे होते. संघटनेचे राज्यउपाध्यक्ष इ.एन.येळणे,जिल्हाध्यक्ष एन.जे.रहांगडाले अतिथी म्हणून उपस्थित होते.याप्रंसगी सेवानिवृत्त झालेले केद्रप्रमुख आर.डी.पटले (भानपुर),डी.बी.चौधरी (झालीया),एच.पी.पटले (सोनपुरी),ए.आर,शेंडे (डोंगरगांव),सौ.एम.एन.राऊत (दांडेगाव),एच.व्ही.भगत(कवलेवाडा),सौ.पी.ए.बोरकर (काटी),आर.आर.अगडे (मोहगांव /तिल्ली),डी.टी.बावणकुळे (चिखली),इ.एन.येळणे (गोरेगांव),एन.जे.रहागंडाले (चिरचाडबांध),एफ.एम.रिनायत(पांढराबोडी), एम.एच.दिक्षित(दासगाव),डी.झेड.लांडगे(सौंदड),एम.पी.हुकरे(निमगाव)यांचा शाल,श्रीफळ,सम्मानपदक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्यावर डी.झेड.लांडगे व बी.एस.पेंदाम यांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सम्मान करण्यात आले.कार्यक्रमात स्व.एस.बी.खोबरागडे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सौ.एन.बी.बोदेले यांनी तर प्रास्तावीक एन.जे.रहांगडाले यांनी केले.आभार सौ.के.डी.शहारे यांनी मानले.कार्यक्रममाच्या यशस्वीतेसाठी जी.एफ.अंबुले,एम.बी.रतनपुरे,डी.जे.परमार,बी डब्लु.भानारकर,एन.एस. हरदुले, बी.एन.हरिणखेडे,यु.एम.बोपचे,एम.एम.राऊत,डी.एन.पेंदाम,वाय.एल.उके,बी.डी.डोंगरे,बी.एस.पेंदाम,कु.एम.आर.वैष्णव,सौ.ए.एस.ब्रामणकर,सौ.एस.एम.पडोळे यानी अथक परीश्रम घेतले.या प्रसंगी पुढील वाटचालीसाठी नविन कार्यकारणीची निवड करण्यात आली.त्यात जिल्हाध्यक्ष सौ.एन.बी.बोदेले, जिल्हाउपाध्यक्ष बी.डब्लु.भानारकर,सरचिटणीस एन.एस.हरदुले,राज्यप्रतिनिधी यु.एम.बोपचे,कोषाध्यक्ष एम.बी.रतनपुरे,सहसचिव बी.डी.डोंगरे यांची एकमताने निवड करण्यात आली.